छत्रपती संभाजीनगर, दि. 31+संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे पहिले
सेवानिवृत्त माहिती संचालक
श्री. एकनाथ दामूजी गायकवाड यांचे आज बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 83 वर्षाचे होते.
कै. गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते एन टू 54
ठाकरे नगर येथे राहत होते.
गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 12 वाजता पडेगाव येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कै. एकनाथ गायकवाड यांनी मुंबई, नवी मुंबई , नाशिक, पुणे, नांदेड , लातूर , धाराशिव, छत्रपती संभाजी नगर येथे यशस्वीपणे सेवा केली आहे.
एक जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सेवन हिल जवळील सेंट थॉमस चर्च येथे मिसा आयोजित केला आहे.
===000===


