Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनुज्ञप्ती चाचणीसाठी वाढविण्यात आला अपॉइंटमेंट कोटा

अनुज्ञप्ती चाचणीसाठी वाढविण्यात आला अपॉइंटमेंट कोटा

पुणे, दि. ३१ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, कासारवाडी तसेच आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ५ जानेवारी २०२६ पासून पुढील कालावधीसाठी अपॉइंटमेंट कोटा वाढविण्यात आला आहे. या अपॉइंटमेंट दररोज सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

 

आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे केवळ दुचाकी संवर्गातील चाचण्या घेण्यात येणार असून, दुचाकी वगळता चारचाकी व इतर सर्व संवर्गातील चाचण्या इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च, कासारवाडी, पुणे येथे होणार आहेत. अनुज्ञप्ती चाचणीसाठी दरराेज २०० चारचाकी व ३०० दुचाकी संवर्गासाठी अपॉइंटमेंट देण्यात येणार असून, ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती पुढील सात दिवसांत संपत आहे, अशा अर्जदारांसाठी अतिरिक्त २५ अपॉइंटमेंट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

 

वाहन अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉइंटमेंट ही आगाऊ जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतच आरक्षित करता येणार असल्याने सर्व अर्जदारांनी वाढीव कोट्याचा लाभ घेऊन आपली अपॉइंटमेंट शक्य तितक्या लवकर आरक्षित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments