गिरवी येथील प्राचीन आणि जागृत असलेल्या गोपाळ कृष्ण मंदिराचे महात्म्य आणि प्रचिती दूर दूर पसरली असून अनेक प्रांतातील साधक दर्शन आणि सेवा सादर करण्यासाठी येत असतात अलिकडेच इंदूर मध्य प्रदेश येथून साधकांनी दूर अंतरावरून येऊन मंदिरात भजन सेवा सादर केली मध्य प्रदेश भागात प्रसिद्ध असलेली आणि मराठी तसेच इतर भाषेतील प्रसिद्ध असलेली भजने सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
साधकांनी ही येथील दिव्य इतिहास ऐकून आणि मूर्तीचे दर्शन घेऊन अतीव समाधान व्यक्त केले आणि हा आयुष्यातील एक अतिशय आनंददायक कार्यक्रम आहे असे नमूद केले व पुन्हा येथे येण्याचा योग यावा अशी प्रार्थना. भगवान गोपाळ कृष्णाकडे केली


