Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून सीईएस २०२६ दरम्‍यान द फर्स्‍ट लुकमध्‍ये 'युअर कम्‍पॅनियन टू एआय लिव्हिंग'चे...

सॅमसंगकडून सीईएस २०२६ दरम्‍यान द फर्स्‍ट लुकमध्‍ये ‘युअर कम्‍पॅनियन टू एआय लिव्हिंग’चे अनावरण

गुरूग्राम, भारत – जानेवारी ५, २०२६: सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने आज विन लास वेगासमधील लॅटोर बॉलरूममध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या सीईएस® २०२६ मधील द फर्स्‍ट लुकमध्‍ये ‘कम्‍पॅनियन टू एआय लिव्हिंग’चे अनावरण केले. या इव्‍हेण्‍टमध्‍ये सॅमसंगचे मुख्य तत्त्व म्‍हणून एआयवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. हा पाया कंपनीच्‍या आरअँडडी उत्‍पादन विकास, कार्यसंचालन आणि युजर अनुभवाला एकत्र आणतो.

 

सॅमसंगच्‍या डिवाईस ईएक्‍स्‍पीरिअन्‍स (डीएक्‍स) डिव्हिजनचे सीईओ व प्रमुख टीएम रोह यांनी द फर्स्‍ट लुकचे उद्घाटन केले, तसेच सांगितले की कंपनीचे एआय नेतृत्‍व आणि त्‍यांच्‍या व्‍यापक, एआय-सक्षम, कनेक्‍टेड परिसंस्‍थेमुळे सॅमसंग वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात खरे एआय कम्‍पॅनियन अनुभव देऊ शकते. हा दृष्टिकोन वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या तंत्रज्ञानामधून अधिक मुलभूत गोष्‍टी उपलब्‍ध होण्‍याची संधी देतो, तसेच सर्वत्र अधिक अर्थपूर्ण क्षणांचा आनंद घेण्‍याची संधी देखील देतो.

 

”सॅमसंग मोबाइल, व्हि‍ज्‍युअल डिस्‍प्‍ले, होम अप्‍लायन्‍सेस व सर्विसेसमध्‍ये अधिक युनिफाईड, अधिक वैयक्तिक अनुभव निर्माण करत आहे,” असे सीईओ टीएम रोह म्‍हणाले. ”आमच्‍या जागतिक कनेक्‍टेड परिसंस्‍थेसह आणि श्रेणींमध्‍ये एआयचा समावेश करत सॅमसंग दररोज अधिक अर्थपूर्ण एआय अनुभव देण्‍यामध्‍ये आघाडीवर आहे.”

 

एंटरटेन्‍मेंट सोबती: साध्‍या व्‍युईंगपलीकडे अद्वितीय अनुभव

 

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍समधील व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले (व्‍हीडी) बिझनेसचे अध्‍यक्ष व प्रमुख एसडब्‍ल्‍यू योंग आणि सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स अमेरिकामधील व्‍हीडी बिझनेसचे चीफ मार्केटिंग अँड पार्टनरशीप्‍स ऑफिसर सुखमणी मोहता यांनी मंचावर पुढाकार घेत मत व्‍यक्‍त केले की सॅमसंगच्‍या डिस्‍प्‍लेमध्‍ये सर्वोत्तम हार्डवेअर व व्हिज्‍युअल इंटेलिजन्‍सचा समावेश केला जात आहे, ज्‍यामुळे ते खरे मनोरंजन सोबती ठरत आहेत. टेलिव्हिजन उद्योगामध्‍ये नेतृत्‍व करण्‍याच्‍या वीस वर्षांच्‍या अनुभवामधून प्रेरणा घेत सॅमसंगने संपूर्ण एआय टीव्‍ही लाइनअप डिझाइन केली आहे, जी वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या टीव्‍हीसोबत परस्‍परसंवाद साधण्‍याचा पूर्णत: नवीन मार्ग देते.

 

या डिस्‍प्‍ले लाइनअपमधील खासियत म्‍हणजे १३०-इंच मायक्रो आरजीबी, जे व्‍याप्‍ती व पिक्‍चर क्‍वॉलिटीमधील मोठी झेप आहे. १३०-इंच मायक्रो आरजीबी कलरच्‍या नवीन युगाला सादर करते, ज्‍यामध्‍ये सॅमसंग टेलिव्हिजन्‍समधील आतापर्यंतचे सर्वात मोठे व सर्वात तपशीलवार स्‍पेक्‍ट्रम आहे, तसेच त्‍याची टाइमलेस फ्रेम डिझाइन व्‍यत्‍ययांना कमी करते आणि अधिक सुस्‍पष्‍टपणे पिक्‍चर दिसण्‍याची खात्री देते. सूक्ष्‍म आकाराचे आरजीबी लाइट सोर्स अनपेक्षित पिक्‍चर क्‍वॉलिटी देते, जेथे प्रत्‍येक मायक्रोस्कोपिक रेड, ग्रीन, व ब्‍ल्‍यू डायोड स्‍वतंत्रपणे चमकत सुस्‍पष्‍ट, वास्‍तविक स्‍वरूपात कलर निर्माण करते. मायक्रो आरजीबी एआय इंजिन प्रो आरजीबी कलर्सवर अचूक नियंत्रण ठेवते आणि प्रत्‍येक सीनमध्‍ये आकर्षक पिक्‍चर क्‍वॉलिटी निर्माण करते.

 

उच्‍च स्‍तरीय व्‍युईंग अनुभवाला अधिक वाढवत व्हिजन एआय कम्‍पॅनियन (व्‍हीएसी)1 एआय तंत्रज्ञानाचा वापर करत संपूर्ण मनोरंजन सोबती म्‍हणून वापरकर्त्‍यांसह काम करते, ज्‍यामधून घरामध्‍ये कुठेही मनोरंजनाचा आनंद घेण्‍यासोबत उत्‍साहात जेवणाचा आस्‍वाद घेता येऊ शकतो. यासह वापरकर्त्‍यांना मनोरंजन, जेवणाचा आस्‍वाद आणि संगीत ऐकण्‍याबाबत मार्गदर्शन मिळू शकते, ज्‍यासह साध्‍या व्‍युईंगच्‍या तुलनेत एकूण टीव्‍ही पाहण्‍याच्‍या अनुभवामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर होते.

 

सॅमसंग व्‍युईंग अनुभव वैयक्तिकृत करण्‍यासाठी सर्वोत्तम मोड्स देखील देते. फूटबॉलप्रेमींसाठी एआय सॉकर मोड प्रो एआय-संचालित पिक्‍चर आणि स्‍टेडियममधील आवाजासारखा दर्जात्‍मक आवाजाच्‍या माध्‍यमातून अधिक उत्‍साहवर्धक खेळाचा अनुभव देते. एआय साऊंड कंट्रोलर प्रो उपस्थित प्रेक्षकांचा, समालोचनाचा किंवा पार्श्वभूमीमधील संगीताचा आवाज कमी-जास्‍त करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामधून टीव्‍ही शोज व चित्रपटांसाठी वैयक्तिककृत ऐकण्‍याचा अनुभव मिळतो. वापरकर्ते शाब्दिक विनंत्‍या करू शकतात, ज्‍यानंतर मायक्रो एलईडी, मायक्रो आरजीबी, ओएलईडी, निओ क्‍यूएलईडी, मिनी एलईडी व यूएचडी टीव्‍ही अशा व्‍हीएसीने सुसज्‍ज कोणताही टीव्‍ही संदर्भासह त्‍या विनंत्‍यांची पूर्तता करतो.

 

विविध प्रकारच्‍या प्रोग्रामिंगमध्‍ये व्‍हीएसी एकूण जीवनशैली अनुभव देखील वाढवते, जेथे वापरकर्ते टीव्‍हीवर पाहणाऱ्या खाद्यपदार्थासाठी रेसिपी शोधू शकतात, ज्‍यासाठी माहिती विचारू शकतात आणि आरोग्‍य व फिटनेस ध्‍येयांशी संलग्‍न असलेल्‍या शिफारशी करण्‍यासाठी सर्वात अद्ययावत माहितीचा वापर करू शकतात. व्‍हीएसी मल्‍टी-डिवाईस कार्यक्षमता देते, तसेच इतर डिवाईसेसना प्रत्‍यक्ष शिफारस करण्‍यात आलेल्‍या रेसिपी देखील पाठवते, जसे नवीन अनावरण करण्‍यात आलेले द मूव्हिंगस्‍टाइल, जे होम व किचन अप्‍लायनसेसचा सहज वापर करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे संपूर्ण परिसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून मल्‍टी-डिवाईस अनुभव मिळतो.

 

सॅमसंगने सलग ११ वर्षे जागतिक साऊंडबार बाजारपेठेचे नेतृत्‍व केले आहे. यंदा, कंपनी आपल्‍या एकीकृत परिसंस्‍थेचा विस्‍तार करण्‍यासाठी दोन नवीन वायफाय स्‍पीकर्स म्‍युझिक स्‍टुडिओ ५ व ७ लॉंच करत आहे. या मॉडेल्‍समध्‍ये साऊंड सिस्‍टम संयोजनांची व्‍यापक श्रेणी आहे, जे ऑडिओव्हिज्‍युअल दर्जा वाढवतात आणि कोणत्‍याही जागेमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतात. प्रत्‍येक मॉडेलमध्‍ये प्रतिष्ठित डिझाइनर एरवान बोरोलिक यांची कालातीत, डॉट डिझाइन संकल्‍पना आहे, जी संगीतामधील युनिव्‍हर्सल प्रतीकामधून प्रेरित आहे आणि सॅमसंगच्‍या सिग्‍नेचर डिझाइन शैलीमध्‍ये सामावलेली आहे.

 

सॅमसंगने अनेक नवीन उत्‍पादनांचे देखील अनावरण केले, जे वापरकर्त्‍यांचे घर व आकर्षकतेमध्‍ये सहजपणे सामावून जाता. नवीन, अल्‍ट्रा-थिन ओएलईडी एस९५एण्‍च मध्‍ये सुधारित बेझल आहे, जे आर्ट गॅलरीमध्‍ये आकर्षकतेची भर करते आणि सॅमसंगचा नवीन पोर्टेबल प्रोजेक्‍टर द फ्रीस्‍टाइल+ मध्‍ये व्‍हीएससी आहे, जो वापरकर्त्‍यांना भिंती व सिलिंग्‍जवर, तसेच कोपरे व पडद्यांवर कन्‍टेन्‍ट पाहण्‍याची सुविधा देतो.

 

२०२६ टीव्‍ही लाइनअपमध्‍ये2 एचडीआर१०+ अॅडवान्‍स्‍ड आहे, जे अधिक ब्राइटनेस, शैली-आधारित ऑप्टिमायझेशन, सर्वोत्तम मोशन स्‍मूदिंग, प्रगत लोकल टोन मॅपिंग आणि सुधारित गेमिंग अनुभव देते.

 

प्रमुख ओटीटी प्रदाते एचडीआर१०+ चा अधिक प्रमाणात अवलंब करत असताना सॅमसंग आपल्‍या २०२६ टीव्‍ही लाइनअपमध्‍ये एचडीआर१०+ अॅडवान्‍स्‍ड लॉंच करणारा पहिला ब्रँड असेल. सॅमसंगने सर्व २०२६ टेलिव्हिजन्‍समध्‍ये कंपनीची नवीन स्‍पॅटियल साऊंड सिस्‍टम एक्लिप्‍सा ऑडिओची देखील भर केली आहे.

 

सॅमसंगने आतापर्यंतचे सर्वात प्रगत ओडिसी गेमिंग मॉनिटर लाइनअपचे देखील अनावरण केले, तसेच पाच नवीन मॉडेल्‍स सादर करत आहे, जे रिझॉल्‍यूशन, रिफ्रेश रेट आणि सर्वोत्तम व्हिज्‍युअल कार्यक्षमतेमधील मर्यादांना दूर करतात. सॅमसंगचे पहिले ६के ३डी ओडिसी जी९ द्वारे नेतृत्वित २०२६ लाइनअपमध्‍ये गेमर्स व क्रिएटर्ससाठी जगातील पहिले डिस्‍प्‍ले तंत्रज्ञान पदार्पण करत आहे, तसेच नेक्‍स्‍ट-जनेरशन ओडिसी जी६ आणि तीन नवीन ओडिसी जी८ मॉडेल्‍स देखील सादर करण्‍यात येत आहेत.

 

या सर्व डिस्‍प्‍ले नाविन्‍यतांमधील प्रमुख बाब म्‍हणजे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली टायझेन ओएस. वापरकर्ते आता सात वर्ष टायझेन ओएस अपग्रेड्सचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामधून खात्री मिळते की टेलिव्हिजन्‍समध्‍ये दीर्घकाळापर्यंत विकसित होत राहतील.

 

होम कम्‍पॅनियन: कनेक्‍टेड स्‍मार्ट अप्‍लायन्‍सेस, जे तुम्‍हाला दिवसभर मार्गदर्शन करतात

 

सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍समधील डिजिटल अप्‍लायन्‍सेस (डीए) डिव्हिजनचे कार्यकारी उपाध्‍यक्ष व प्रमुख चेलोगी किम आणि सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स अमेरिका (एसईए) मधील डीएच्‍या इंटीग्रेटेड मार्केटिंगच्‍या प्रमुख एलिझाबेथ अँडसन यांनी होम अप्‍लायन्‍सेस, उपयुक्‍त ठरणारे होम कम्‍पॅनियन्‍स देत विकसित होण्‍यापासून दैनंदिन कामांचा त्रास कमी करण्‍यापर्यंत सॅमसंगच्‍या दृष्टिकोनाला सांगितले. चेलोगी किम यांनी सांगितले की डिसेंबर २०२५ पर्यंत स्‍मार्टथिंग्‍जने ४३० दशलक्षहून अधिक वापरकर्त्‍यांना सेवा दिली आहे, ज्‍यासह सॅमसंग मोठ्या प्रमाणात व सखोल माहितीसह सक्षम होत आहे, ज्‍यामुळे इतर ब्रँड्सच्‍या तुलनेत वरचढ ठरत आहे.

 

यामध्‍ये महत्त्वपूर्ण आहे फॅमिली हब. हा एआय-सक्षम रेफ्रिजरेटर घरामधील प्रमुख आकर्षण ठरत आहे आणि आता गुगल जेमिनीसह डिझाइन करण्‍यात आलेल्‍या एआय व्हिजनमध्‍ये अपग्रेड करण्‍यात आला आहे3. हा रेफ्रिजरेटर एआय भविष्‍यासाठी राहणीमानाला नव्‍या उंचीवर नेतो. या अपडेटसह एआय व्हिजन खाद्यपदार्थ घटकांना ओळखण्‍यामधील विद्यमान मर्यादांना ओळखतो, तसेच रेफ्रिजरेटमध्‍ये ठेवण्‍यात आलेल्‍या व रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढण्‍यात आलेल्‍या गोष्‍टींवर देखरेख ठेवतो, ज्‍यामुळे आहार नियोजन व आहार व्‍यवस्‍थापन सोपे होते. फॅमिली हबने आतापर्यंत १० सीईएस इनोव्‍हेशन अवॉर्ड्स जिंकले आहेत आणि सॅमसंगच्‍या एआय-सक्षम फ्रिजेसनी गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये पुरस्‍कार मिळवले आहेत.

 

गेमिफाईड वैशिष्‍ट्य ‘व्‍हॉट्स फॉर टूडे?’च्‍या माध्‍यमातून निवडक रेफ्रिजरेटर्स रेफ्रिजरेटरमध्‍ये असलेल्‍या घटकांच्‍या आधारावर रेसिपीबाबत शिफारशी देतात किंवा यादृच्छिक शिफारशी देखील देतात, ज्‍यामुळे पाककलांबाबत निवड करताना होणारा त्रास दूर होतो. निवड केल्‍यानंतर स्‍मार्टथिंग्‍ज फूडच्‍या माध्‍यमातून रेसिपी दाखवल्‍या जातात, जेथे वापरकर्त्‍यांना पायरी-पायरीनुसार मार्गदर्शन मिळते आणि त्‍वरित रेसिपी बनवण्‍यास सुरूवात करण्‍याला मदत होते. निवडण्‍यात आलेली रेसिपी कनेक्‍टेड कूकिंग अप्‍लायन्‍सेसवर देखील पाठवता येऊ शकते, ज्‍यानंतर त्‍वरित प्रकिया सुरू करता येते. व्हिडिओ टू रेसिपी अधिक सुलभता देते, जेथे वापरकर्त्‍यांना शिफारस करण्‍यात आलेल्‍या कूकिंगबाबत व्हिडिओज मिळतात आणि या व्हिडिओजना सहजपणे फॉलो करता येणाऱ्या पाय-यांमध्‍ये बदलता येते. वापरकर्ते या पाय-यांना फॉलो करत कूकिंग करू शकतात, ज्‍यासाठी व्हिडिओ पॉज करण्‍याची किंवा मागे घेण्‍याची गरज भासत नाही.

 

सॅमसंगने नवीन, साप्‍ताहिक रिपोर्ट फूडनोटचे देखील अनावरण केले, जे सर्वाधिक वापरण्‍यात आलेले घटक व पाककला शिफारशींमधून वापरकर्त्‍यांच्‍या आहार सेवन पद्धतींची पुनरावृत्ती करते आणि कोणत्‍या घटकांना पुन्‍हा साठवून ठेवावे याबाबत मार्गदर्शन करते. तसेच, नाऊ ब्रिफमध्‍ये आता फॅमिली हब स्क्रिनवरील अधिक विजेट्सचा समावेश करण्‍यात आला आहे, तसेच वॉईस आयडीसह कुटुंबामधील सदस्‍यांना ओळखता येऊ शकते आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीशी संबंधित कन्‍टेन्‍ट दाखवू शकते. शेवटचे म्‍हणजे ही वैशिष्‍ट्ये एकत्रित आठवडाभर विविध उपयुक्‍त माहिती देतात.

 

लॉण्‍ड्रीसंदर्भात बीस्‍पोक एआय लॉण्‍ड्री कॉम्‍बो कपड्यांचा भार हस्‍तांतरित करण्‍याची गरज दूर करते, ज्‍यासह घराघरांमधील मोठ्या त्रासाचे निराकरण झाले आहे. या वर्षीच्‍या मॉडेलमध्‍ये सुधारित वैशिष्‍ट्ये आहेत, जसे गतीशील सुपर स्‍पीड सायकल आणि कपडे सुकवण्‍याची सुधारित कार्यक्षमता. तसेच, सॅमसंगचा नवीन बीस्‍पोक एआय एअरड्रेसर कपड्यांच्‍या बाबतीत आणखी एका समान समस्‍येचे निराकरण करतो. यामध्‍ये ऑटो रिंकल केअर आहे, जे प्रबळ हवा व स्‍टीम जेट्स प्रसारित करते, ज्‍यासह शर्टांवर कोणत्‍याही सुरकुत्‍या राहत नाहीत. सर्व वापरकर्त्‍यांना फक्‍त त्‍यांचे शर्ट सुकत घालायचे आहेत, ज्‍यामुळे सकाळच्‍या वेळी कपडे धुण्‍याचा त्रास कमी झाला आहे.

 

क्‍वॉलकॉम ड्रॅगनविंग™ प्रोसेसरची शक्‍ती असलेल्‍या बीस्‍पोक एआय जेट बोट स्‍टीम अल्‍ट्रामध्‍ये अॅक्टिव्‍ह स्टिरिओ ३डी सेन्‍सर आहे, जे कॉफी, ज्‍यूस यासारख्‍या द्रवपदार्थांना किंवा पाण्‍यासारख्‍या पारदर्शक लिक्विड्सना ओळखते. यामधील कॅमेरा नेव्हिगेशनसह मदत करते, तसेच रोबोट व्‍हॅक्‍यूम वापरकर्ते घरापासून दूर असताना मॉनिटरिंग डिवाईसप्रमाणे काम करते, त्‍यांना त्‍यांचे पाळीव प्राणी आणि संशयास्‍पद कृतीबाबत सूचना देते. स्‍मार्ट बिक्‍स्‍बीसह वापरकर्ते त्‍यांच्‍या रोबोट व्‍हॅक्‍यूमशी परस्‍परसंवाद साधत सहजपणे काम करू शकतात. अधिक कनेक्‍टीव्‍हीटी आणि सर्वांगीण एआय-समर्थित अनुभवासाठी सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एअर अप्‍लायन्‍सेसना सीईएस इनोव्‍हेशन अवॉर्ड मिळाला आहे.

 

अतिरिक्‍त फायदे म्‍हणजे स्‍मार्ट होम अनुभवामध्‍ये वास्‍तविक, अर्थपूर्ण बचत मिळण्‍यासाठी हार्टफोर्ड स्‍टीम बॉइलर (एचएसबी) सोबत खास सहयोग. एचएसबीचे अध्‍यक्ष व सीईओ ग्रेग एम. बॅरट्स यांनी प्रेझेन्‍टेशनमध्‍ये सहभाग घेतला आणि सहयोगाबाबत चर्चा केली, तसेच विमा प्रीमियम्‍स कमी करण्‍याकरिता स्‍मार्टथिंग्‍जशी कनेक्‍ट असलेले स्‍मार्ट अप्‍लायन्‍सेस असण्‍याचे संभाव्‍य फायदे स्‍पष्‍ट केले. हे सर्वोत्तम एआय युग आहे, ज्‍यामध्‍ये वापरकर्त्‍यांना अधिक सुरक्षितता मिळण्‍यासह खर्च कमी झाला आहे. २०२५ मध्‍ये यूएसमध्‍ये यशस्‍वी पायलट चाचणीनंतर हा सहयोग यूएसबाहेर अधिक राज्‍यांमध्‍ये विस्‍तारित होत आहे, तसेच इतर जागतिक प्रांतांमधील आघाडीच्‍या गृहविमा कंपन्‍यांसोबत विस्‍तारित होत आहे.

 

केअर सोबती: प्रतिक्रियात्‍मकवरून सक्रिय केअरकडे वाटचाल

 

शेवटचे म्‍हणजे, सॅमसंग रिसर्च अमेरिका (एसआरए) मधील डिजिटल हेल्‍थचे उपाध्‍यक्ष व प्रमुख प्रवीण राजा यांनी सॅमसंगच्‍या एकीकृत डिवाईस परिसंस्‍थेद्वारे सक्षम इंटेलिजण्‍ट केअरसाठी सॅमसंगचा दीर्घकालीन दृष्टिकोन सादर केला, जेथे केअरला प्रतिक्रियात्‍मक गरजेवरून सक्रिय संधीमध्‍ये बदलले जात आहे. एआयच्‍या माध्‍यमातून फोन्‍स, अप्‍लायन्‍सेस, वेअरेबल्‍स आणि इतर कनेक्‍टेड डिवाईसेस वापरकर्त्‍यांना संभाव्‍य आरोग्‍यसंबंधित समस्‍या उद्भवण्‍यापूर्वी प्रतिबंध करण्‍यास मदत करतील.

 

उदाहरणार्थ, सॅमसंगचा वैयक्तिकृत हेल्‍थ कोचिंग देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍याद्वारे प्रभावी व्‍यायाम व झोपेसंदर्भात मार्गदर्शन केले जाईल, ज्‍यामुळे गंभीर आजारांचा धोका कमी होण्‍यास मदत होईल, तसेच कनेक्‍टेड रेफ्रिजरेटर्समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या घटकांच्‍या आधारावर योग्‍य रेसिपींबाबत सल्‍ला देखील दिला जाईल. कोणतीही असामान्‍य चिन्‍हे किंवा पद्धती निदर्शनास आल्‍यास वापरकर्त्‍यांना दक्ष केले जाईल, जेथे ते एक्‍सहेल्‍थ प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून प्रदात्‍यांना त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत माहिती कळवू शकतात आणि व्‍हर्च्‍युअल प्रोफेशनल सल्‍लामसलत मिळवू शकतात.

 

प्रतिबंधात्‍मक आरोग्‍याचे महत्त्व ओळखत सॅमसंग संशोधन सहयोगांच्‍या माध्‍यमातून स्‍मृतिभ्रंश निदानामधील त्‍यांच्‍या क्षमता वाढवत आहेत, जेथे वेअरेबल डिवाईसेसमध्‍ये गतीशीलता, संभाषण व सहभाग यासंदर्भात बदल करण्‍यात आले आहेत, ज्‍यामधून दीर्घकालीन संज्ञानात्‍मक बदल दिसून येऊ शकतात.

 

सॅमसंग नॉक्‍स व नॉक्‍स मॅट्रिक्‍स या उच्‍च वैयक्तिकृत परिसंस्‍थेचा पाया आहेत, जे प्रत्‍येक वेळी युजर डेटाचे संरक्षण करतात. एआय सतत विकसित होत असताना नॉक्‍स व नॉक्‍स मॅट्रिक्‍समध्‍ये देखील बदल होत आहेत. सतत बदल होत असताना देखील सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देण्‍यासाठी सॅमसंगच्‍या सिक्‍युरिटी सिस्‍टम्‍स सतत एआय जोखीम ओळखत आहेत, एआय प्रशिक्षण प्रक्रियांमधील डेटाचे संरक्षण करण्‍यासाठी प्रगत होत आहेत आणि रेड टीम विश्‍लेषणाच्‍या माध्‍यमातून मॉडेल्‍सना मंजूरी देत आहेत.

 

सीईएसमध्‍ये सॅमसंग एक्झिबिशन झोन जनतेसाठी ४ जानेवारी ते ७ जानेवारी २०२६ पर्यंत उपलब्‍ध आहे. अधिक

माहितीसाठी भेट द्या: Samsung Newsroom.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments