गुरूग्राम, भारत – जानेवारी ५, २०२६: सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज सीईएस २०२६ मध्ये जगातील पहिल्या १३०-इंच मायक्रो आरजीबी टीव्ही (आर९५एच मॉडेल)चे अनावरण केले, ज्यासह त्यांचा सर्वात मोठा मायक्रो आरजीबी डिस्प्ले आणि अल्ट्रा-प्रीमियम डिस्प्लेंसाठी आकर्षक नवीन डिझाइन सादर केली आहे.
”मायक्रो आरजीबीमध्ये आमची सर्वोच्च पिक्चर क्वॉलिटी नाविन्यता आहे आणि नवीन १३०-इंच मॉडेल त्या दृष्टिकोनाला अधिक नव्या उंचीवर घेऊन जाते,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या व्हिज्युअल डिस्प्ले (व्हीडी) बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष हुन ली म्हणाले. ”आम्ही दशकापूर्वी लॉंच केलेल्या आमच्या मूळ डिझाइन तत्त्वामध्ये अधिक सुधारणा करत आहोत, ज्यासह आधुनिक काळातील पिढीला अद्वितीय प्रीमियम डिस्प्ले मिळेल, जो तंत्रज्ञानासह डिझाइन करण्यात आला आहे.”
आकर्षक डिझाइन, जी टेलिव्हिजनला नव्या उंचीवर घेऊन जाते
मायक्रो आरजीबी टीव्हीची लक्षवेधक रचना, नेक्स्ट-जनरेशन कलर तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइन दृष्टिकोनामधून प्रीमियम आकर्षकतेसह अभियांत्रिकी सर्वोत्तमतेमधील सॅमसंगचे दीर्घकालीन नेतृत्व दिसून येते. मोठी फ्रेम आणि सुधारित ऑडिओ कार्यक्षमतेसह १३०-इंच डिस्प्ले टेलिव्हिजनपेक्षा सर्वोत्तम विंडो सारखा दिसण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो संपूर्ण रूममध्ये उत्साहपूर्ण व्हिज्युअल अनुभवाची खात्री देतो.
या टीव्हीमध्ये सॅमसंगच्या २०१३ टाइमलेस गॅलरी डिझाइनची आधुनिक उत्क्रांती टाइमलेस फ्रेमच्या माध्यमातून आधुनिक, गॅलरी-प्रेरित आकर्षकता आहे. तसेच सुधारित फ्रेममधून ‘टेक्नॉलॉजी अॅज आर्ट’ तत्त्व दिसून येते. भव्य आर्किटेक्चरल विंडोच्या फ्रेममधून प्रेरित मोठ्या आकाराची स्क्रिन टीव्हीच्या कड्यांमधून सुस्पष्टपणे दिसते, जेथे टीव्हीला कलात्मक आकर्षकतेमध्ये बदलते, ज्यामधून उत्साहपूर्ण मनोरंजनाची खात्री मिळते. डिस्प्लेच्या फ्रेममध्ये एकीकृत करण्यात आलेला साऊंड स्क्रिनच्या आकाराला साजेसा आहे, ज्यामुळे कोणत्याही लिव्हिंग स्पेसमध्ये पिक्चर व ऑडिओ नैसर्गिकरित्या सामावून जातात.
टीव्हीच्या आकारमानानुसार अद्वितीय व्युईंग अनुभव
१३०-इंच मायक्रो आरजीबी मॉडेलमध्ये सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात प्रगत मायक्रो आरजीबी नाविन्यता आहे. मायक्रो आरजीबी एआय इंजिन प्रो, मायक्रो आरजीबी कलर बूस्टर प्रो आणि मायक्रो आरजीबी एचडीआर प्रो असलेला हा टीव्ही एआयच्या माध्यमातून ड्युअल टोन्स वाढवतो आणि कॉन्ट्रॅस्ट अधिक सुधारित करतो, ज्यामधून प्रखर व गडद सीन्समध्ये वास्तविक व पिक्चर फिडेलिटीप्रमाणे आकर्षक रंगसंगती व सुस्पष्टता मिळते.
डिस्प्ले मायक्रो आरजीबी प्रीसीशन कलर १०० च्या माध्यमातून पिक्चर कार्यक्षमता वाढवते, तसेच १०० टक्के बीटी २०२० व्यापक कलर गम्यूट देते. अचूक मायक्रो आरजीबी कलर निर्मितीसाठी व्हरबँड डेर इलेक्ट्रोटेक्निक (व्हीडीई)द्वारे प्रमाणित हा डिस्प्ले नियंत्रित रंगसंगती निर्माण करतो, ज्यामुळे स्क्रिनवरील चित्र वास्तविक असल्यासारखे वाटते. १३०-इंच मॉडेलमध्ये सॅमसंगचे प्रोप्रायटरी ग्लेअर फ्री तंत्रज्ञान देखील आहे, जे परावर्तन (रिफ्लेक्शन्स) कमी करते, विविध प्रकाश स्थितींमध्ये सर्वोत्तम व्युईंग अनुभवासाठी सुस्पष्ट कलर व कॉन्ट्रॅस्ट देते.
या उत्पादनामध्ये सुधारित पिक्चर व साऊंड क्वॉलिटी देण्यासाठी एचडीआर१०+ अॅडवान्स्ड आणि एक्लिप्सा ऑडिओ आहे. तसेच सॅमसंगचे सुधारित व्हिजन एआय कम्पॅनियन2 देखील आहे, जे संवादात्मक शोध, सक्रिय शिफारशी आणि एआय वैशिष्ट्ये व अॅप्स उपलब्ध करून देते, जसे एआय फूटबॉल मोड प्रो, एआय साऊंड कंट्रोलर प्रो, लाइव्ह ट्रान्सलेट, जनरेटिव्ह वॉलपेपर, मायक्रोसॉफ्ट कॉपीलॉट आणि परप्लेक्सिटी. लास वेगास, नेवाडामध्ये सीईएस २०२६ (CES 2026) दरम्यान सॅमसंगच्या एक्झिबिशन झोनमध्ये या अद्वितीय डिस्प्लेला दा
खवण्यात येईल.


