Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कलमाडी यांनी नेले -कृष्णकुमार गोयल

पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कलमाडी यांनी नेले -कृष्णकुमार गोयल

पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय कला क्रीडा उद्योग आणि पर्यटन नकाशावर नेणारे लोकनेते सुरेश कलमाडी यांचे निधन जीवाला चटका लावून गेले. त्यांनी सुरु केलेले पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथोन हे सर्व उपक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत राहिले. ‘उपक्रम सुरु करणे सोपे असते चालवणे मात्र अवघड असते’ असे ते मला नेहमी म्हणायचे. मात्र श्री. कलमाडींच्या नेतृत्वाखाली हे सर्व उपक्रम दीर्घकाळ अखंडपणे चालू आहेत याचे श्रेये श्री. कलमाडींनाच द्यावे लागेल. पुणे फेस्टिव्हल चा उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळाले. पुणे शहराचा विकास या भव्यतेने त्यांनी केला त्याबद्दल सारे पुणेकर निश्चितच कृतज्ञ राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments