Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमवे इंडिया चा आता जलद आणि अखंड सेवेसह घरपोच डिलिव्हरीचा पूर्णपणे बदलेला...

अॅमवे इंडिया चा आता जलद आणि अखंड सेवेसह घरपोच डिलिव्हरीचा पूर्णपणे बदलेला अनुभव

भारतातील 90% पेक्षा जास्त पिनकोड्सपर्यंत पोहोचून आपली व्याप्ती दुप्पट केली आहे; एका डिजिटल ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म आणि अधिक चांगल्या लॉजिस्टिक पार्टनर्समुळे आता डिलिव्हरीची सेवा आणखी जलद होणार आहे

 

नवी दिल्ली, [7th January 2026]: स्वास्थ्य आणि कल्याणाच्या गरजा पूर्ण करणारी एक आघाडीची कंपनी, अॅमवे इंडिया ने आज आपल्या होम डिलिव्हरी सेवेमध्ये मोठ्या सुधारणा केल्याची माहिती दिली. या सुधारणांमुळे देशभरातील वितरक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी जलद, अधिक विश्वासार्ह आणि अखंड ऑर्डर करता येण्याचा अनुभव देण्याची कंपनीची वचनबद्धता अधिक स्पष्ट झाली आहे. गेल्या पाच वर्षांत, ॲमवे ने आपली होम डिलिव्हरी क्षमता मोठ्या प्रमाणात मजबूत केली असून, डिलिव्हरीच्या वेळेत 48% कपात (3.1 दिवसांवरून अवघ्या 1.6 दिवसांपर्यंत) करून मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी मिळणाऱ्या डिलिव्हरीचे प्रमाण 29% वरून 55% पेक्षा जास्त झाले आहे. या सुधारित अनुभवाला त्यांच्या सर्व्हिस नेटवर्कच्या मोठ्या विस्ताराची जोड मिळाली असून, आता हे नेटवर्क 8000 वरून 17,500 पेक्षा जास्त पिन कोड्सपर्यंत पोहोचले आहे, जे भारताच्या एकूण पिन कोड्सच्या 90% पेक्षा जास्त आहे. हे टप्पे भारतातील ग्राहकांसाठी दर्जेदार वेलनेस उत्पादने सहज उपलब्ध करून देण्याच्या ॲमवे च्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.

 

या बदलावर भाष्य करताना अॅमवे इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर रजनीश चोप्रा म्हणाले, “आमच्या धोरणाच्या केंद्रस्थानी वितरक आणि ग्राहक असल्याने, आम्ही होम डिलिव्हरीला एक ‘स्ट्रॅटेजिक पिलर’ (धोरणात्मक स्तंभ) म्हणून विकसित करत आहोत—असा स्तंभ जो अधिक चांगली सेवा देण्यास सक्षम आहे, उत्पादनांची उपलब्धता सुधारतो आणि संपूर्ण भारतात विनाअडथळा अनुभव देतो. हा बदल मजबूत राष्ट्रीय भागीदारी, अधिक सक्षम डिजिटल पाया आणि अत्यंत चपळ पुरवठा साखळीमधील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे शक्य झाला आहे; ज्यामुळे आम्हाला वेगाने प्रतिसाद देणे, अधिक हुशारीने काम करणे आणि अधिक सातत्याने सेवा देणे सोपे झाले आहे. प्रत्यक्षात जमिनीवर जे बदल दिसत आहेत, त्यावरून मला खात्री मिळतेय की: आमची पोहोच आता अधिक मजबूत आहे, आमची यंत्रणा अधिक स्मार्ट आहे आणि आजचा अनुभव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने सुटसुटीत आहे. पुढे जाताना, आमचे लक्ष विश्वासार्हता अधिक वाढवण्यावर, ‘अनबॉक्सिंग’ अनुभव अधिक चांगला करण्यावर आणि भारतभरातील आमच्या ग्राहकांसाठी भविष्यासाठी सज्ज अशी डिलिव्हरी इकोसिस्टम तयार करून आमचा दर्जा अधिक उंचावण्यावर आहे.”

 

यात भर घालत, अॅमवे इंडिया चे ग्लोबल ओम्नी चॅनेल लॉजिस्टिक्स, कस्टमर सर्व्हिसेस आणि उत्तर क्षेत्राचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट संजीव सुरी म्हणाले, “सप्लाय चेन आता केवळ ‘खर्चाचे केंद्र’ न राहता ‘मूल्य निर्माण करणारे’ माध्यम म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे ॲमवेमध्ये आमचे लक्ष एक अशी इंटेलिजेंट, प्रतिसाद देणारी आणि लोकांच्या गरजा समजून घेणारी यंत्रणा उभारण्यावर आहे, जी ग्राहकांना खऱ्या अर्थाने उत्तम सेवा देईल. आमच्या होम डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये झालेली प्रगती याच बदलाचे प्रतिबिंब आहे. प्रगत ॲनालिटिक्स, विविध टीम्समधील उत्तम समन्वय आणि राष्ट्रीय कुरिअर कंपन्यांसोबतच्या भक्कम भागीदारीमुळे आम्ही डिलिव्हरीचा वेग वाढवला आहे, विश्वासार्हता सुधारली आहे आणि विविध भौगोलिक भागांतील ग्राहकांना सेवा देण्याची आमची क्षमता अधिक मजबूत केली आहे. आमचा हा प्रवास रियल-टाइम व्हिजिबिलिटी (थेट देखरेख), सक्रिय संवाद आणि आव्हानात्मक काळात घेतलेल्या ठाम निर्णयांमुळे यशस्वी झाला आहे. भविष्याचा विचार करता, भारतभरातील आमच्या ग्राहकांसाठी विनाअडथळा आणि ‘फ्युचर-रेडी’ डिलिव्हरी अनुभव तयार करण्यासाठी आम्ही एआय, डिजिटल टूल्स आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण या गोष्टीं

चा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments