Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedकमांड मॅक्‍ससह ऑल-न्‍यू टाटा पंच भारतातील लोकप्रिय एसयूव्‍ही आता अधिक गतीशील,...

कमांड मॅक्‍ससह ऑल-न्‍यू टाटा पंच भारतातील लोकप्रिय एसयूव्‍ही आता अधिक गतीशील, अधिक स्‍मार्ट, अधिक सुरक्षित आणि अधिक आकर्षक आहे

रोमांचपूर्ण ड्राइव्‍हचा आनंद: विभागातील अग्रणी कार्यक्षमतेसह शक्तिशाली आयटर्बो इंजिन

जगातील पहिली नाविन्‍यता: ट्विन-सिलिंडर आयसीएनजी टेक्‍नॉलॉजीसह एएमटी

सुरक्षिततेला प्रथम प्राधान्‍य: ५-स्‍टार भारत एनसीएपी सेफ्टी रेटिंग

सुरूवातीची किंमत: फक्‍त ५.५९ लाख रूपयांपासून

मुंबई, जानेवारी १३, २०२६: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि. (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्‍या कार्स व एसयूव्‍ही उत्‍पादक कंपनीने आज भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्‍ही नवीन, अधिक गतीशील, अधिक स्‍मार्ट आणि अधिक आकर्षक लुकमध्‍ये लाँच करण्‍याची घोषणा केली.

नवीन टाटा पंचमध्‍ये तिच्‍या अद्वितीय सिग्‍नेचर ‘कमांड मॅक्‍स’ अंतर्गत अद्वितीय शक्‍ती, अधिक आरामदायीपणा, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व शक्तिशाली स्‍टायलिंगचे संयोजन आहे. नवीन टाटा पंच फक्‍त ५.५९ लाख रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम, नवी दिल्‍ली) सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे.

टाटा पंच ऑक्‍टोबर २०२१ मध्‍ये पदार्पण करण्‍यासह सबकॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये आघाडीवर आहे आणि जवळपास ७००,००० ग्राहकांनी विश्वास दाखवला आहे. यासह नवीन टाटा पंच आता उद्योग मापदंड निर्माण करण्‍याचा आपला वारसा प्रगत करत आहे, जेथे दोन नवीन पॉवरट्रेन्‍समध्‍ये लाँच करण्‍यात आली आहे:

१.२ लिटर टर्बोचार्ज्‍ड आयटर्बो रेव्‍होट्रॉन इंजिनसह उत्‍साहवर्धक कार्यक्षमतेचा आनंद घ्‍या. हे इंजिन अद्वितीय ड्रायव्हिंग उत्‍साहासाठी दर्जात्‍मक पॉवर-टू-वेट रेशिओ देते.

अद्वितीय कार्यक्षमता आणि सोयीसुविधेसाठी ट्विन-सिलिंडर आयसीएनजी तंत्रज्ञानासह एएमटी गिअरबॉक्‍सचे क्रांतिकारी संयोजन असलेल्‍या पहिल्‍या एसयूव्‍हीला ड्राइव्‍ह करण्‍याचा आनंद घ्‍या.

ऑल-न्‍यू टाटा पंच लाँच करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे एमडी व सीईओ श्री. शैलेश चंद्रा म्‍हणाले, ”पंचमधून नेहमी भारतीयांच्‍या सर्वसमावेशक महत्त्‍वाकांक्षा दिसून आल्‍या आहेत, तसेच वैशिष्‍ट्य-संपन्‍न पॅकेजसह एसयूव्‍ही अनुभवाचे लोकशाहीकरण केले आहे. ज्‍यामुळे ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्‍ही ठरली आहे. पंचने भारतीयांना लक्षवेधक स्थिती व आत्‍मविश्वासासह लांबचा, तणावमुक्‍त, आंतरशहरीय प्रवासाचा आनंद घेण्‍याचे स्‍वातंत्र्य दिले. आज, आम्‍ही या अनुभवाला नव्‍या उंचीवर नेले आहे. नवीन पंचसह आम्‍ही या श्रेणीमधील एसयूव्‍हीला नवीन आकार दिला आहे, जेथे ग्राहकांच्‍या अभिप्रायानुसार आधुनिक तंत्रज्ञानासह ही एसयूव्‍ही डिझाइन करण्‍यात आली आहे. ही एसयूव्‍ही अधिक गतीशील, अधिक स्‍मार्ट आणि अधिक सुरक्षित आहे, ज्‍याला पूरक आकर्षक, शक्तिशाली पवित्रा आहे, ज्‍यामधून कमांड मॅक्‍सचा आत्‍मविश्वास मिळतो. या उत्‍क्रांतीमधून ग्राहकांना अधिकाधिक आनंद देण्‍यासाठी सतत नाविन्‍यता आणण्‍याप्रती आमची रुची दिसून येते. आम्‍हाला भारतातील अनेकांचे मन जिंकण्‍यासाठी नवीन पंच लाँच करण्‍याचा आनंद होत आहे.”

कृपया खाली नवीन टाटा पंचच्‍या किमतींचा (एक्‍स-शोरूम, नवी दिल्‍ली) संपूर्ण तक्‍ता देण्‍यात आला आहे.

 

नवीन पंच परसोना

रेव्‍होट्रॉन पेट्रोल एमटी

रेव्‍होट्रॉन पेट्रोल एएमटी

आयसीएनजी एमटी

आयसीएनजी एएमटी

आयटूर्बो एमटी

किंमत

स्‍मार्ट

५.५९

 

 

६.६९

 

 

 

 

प्‍युअर

६.४९

 

 

७.४९

 

 

 

 

प्‍युअर +

६.९९

७.५४

७.९९

८.५४

 

 

प्‍युअर + एस

७.३४

७.८९

८.३४

 

 

 

 

अॅडव्‍हेंचर

७.५९

८.१४

८.५९

९.१४

८.२९

अॅडव्‍हेंचर एस

७.९४

 

 

८.९४

९.४९

 

 

अकॉम्‍प्‍लीश

८.२९

८.८४

९.२९

 

 

 

 

अकॉम्‍प्‍लीश + एस

८.९९

९.५४

 

 

१०.५४

९.७९

 

 

ऑल-न्‍यू टाटा पंचबाबत अधिक माहिती

कमांड बोल्‍डर

नवीन पंच क्षमता, आकर्षकता आणि अत्‍याधुनिक नाविन्‍यतेच्‍या अद्वितीय संयोजनासह सबकॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. या एसयूव्‍हीचा आकर्षक, अपराइट स्‍टान्‍स आणि शिल्‍पाकृती पृष्‍ठभाग सर्वांचे लक्ष वेधून घेते, तर शक्तिशाली ३डी फ्रण्‍ट ग्रिल व बल गार्ड बम्‍परसह पॉवरसाइट एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि इन्फिनिटी ग्‍लो एलईडी कनेक्‍टेड टेल लॅम्‍प्‍स आत्‍मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगची खात्री देतात. हाय-सेट रिअल प्रमाण, स्‍पोर्टी स्‍पॉयलर आणि आकर्षक अलॉई व्‍हील्‍स या एसयूव्‍हीची आकर्षकता अधिक वाढवतात.

आतील बाजूस ऑल-न्‍यू पंचमध्‍ये एैसपैस केबिन आहे, जी नियंत्रण ठेवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. आकर्षक डॅशबोर्ड, प्रीमियम इन्‍फोटेन्‍मेंट आणि अॅम्बियट लायटिंग केबिनमध्‍ये प्रसन्‍न वातावरण निर्माण करतात. ड्रायव्‍हर-केंद्रित एर्गोनॉमिक्‍स, उत्तम सीटिंग व्‍यवस्‍था आणि स्‍मार्ट पॅकेजिंग तडजोड न करता आरामदायीपणा व व्‍यावहारिकतेची खात्री देतात. आकर्षक इंटीरिअर पॅलेटमध्‍ये माऊंटन-प्रेरित ग्राफिक्‍स व डार्क ग्रे रंगामधील फिनिशिंग आहे, ज्‍यामधून एसयूव्‍हीचा कुठेही ड्रायव्हिंगचा आनंद घेण्‍याचा डीएनए दिसून येतो.

एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंज सीट्ससह विस्‍तारित थाय सपोर्ट लांबच्‍या प्रवासादरम्‍यान आरामदायी प्रवासाची खात्री देतो, तर ड्युओ टोन सिग्‍नेचर डॅश आकर्षकता वाढवते. फ्लॅट रिअल फ्लोअर डिझाइन पायांसाठी एैसपैस जागा देते, ज्‍यामधून प्रत्‍येक प्रवासीला आत्‍मविश्वासपूर्ण व आनंददायी प्रवासाचा आनंद घेता येतो.

कमांड स्‍मार्टर

नवीन पंच ड्रायव्‍हरला परिपूर्ण नियंत्रणासह ड्राइव्‍ह करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या एसयूव्‍हीमध्‍ये प्रगत तंत्रज्ञान व अधिक आरामदायीपणाचे अद्वितीय मिश्रण आहे. प्रत्‍येक वैशिष्‍ट्य आत्‍मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद देण्‍यासाठी आणि सोयीसुविधा वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यासह प्रत्‍येक प्रवास आरामदायी, कनेक्‍टेड आणि नियंत्रणात असण्‍याची खात्री मिळते.

आपल्‍या श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करत नवीन पंचमध्‍ये अनेक प्रीमियम नाविन्‍यता आहेत, ज्‍या आरामदायीपणा व क्षमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात. शक्तिशाली ६५-वॅट फ्रण्‍ट टाइप-सी यूएसबी चार्जर डिवाईस जलदपणे, विश्वसनीयपणे चार्जिंग होण्‍याची खात्री देतो, तर रेन सेन्सिंग वायपर्स अनपेक्षित वातावरणामध्‍ये अधिक सोयीसुविधा देतात. अल्‍ट्रा व्‍ह्यू २६.०३ सेमी एचडी इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टम दर्जात्‍मक रिझॉल्‍यूशन, सुस्पष्टता आणि सर्वोत्तम इंटरफेस देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक परस्‍परसंवाद सहजपणे होतो.

ऑटो-डिमिंग आयआरव्‍हीएम आणि ३६०-डिग्री एचडी सराऊंड व्‍ह्यू सिस्‍टमसह सुरक्षितता व सोयीसुविधेच्‍या बाबतीत कोणतीही तडजोड करण्‍यात आलेली नाही, ज्‍यामुळे ड्रायव्हिंग करताना अधिक नियंत्रण मिळते. आतील बाजूस रिअर आर्मरेस्‍ट, क्‍लायमा टच ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोलसह आरामदायीपणामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, तसेच केबिनमध्‍ये सतत ताज्‍या हवेसाठी एअर प्‍युरिफायर आहे.

कमांड तंत्रज्ञान, स्‍मार्ट डिजिटल स्‍टीअरिंग व्‍हीलसह उत्तम नियंत्रण राखा, तसेच पॉवरसाइट एलईडी हेडलॅम्‍प्‍स रस्‍त्‍यावर सुस्‍पष्‍ट प्रकाश दिसण्‍याची खात्री देतात. अधिक सुरक्षिततेसाठी प्रमाणित म्‍हणून आयटीपीएमएस आहे, ज्‍याला पूरक प्रीमियम ऑडिओ सिस्‍टम आहे, ज्‍यामध्‍ये चार स्‍पीकर्स व चार ट्विटर्स आहेत, जे विशाल आवाजाची खात्री देतात.

फॉलो-मी-होम लॅम्‍प्‍स, ९० अंश डोअर ओपनिंगसह कमांड एण्‍ट्री आणि प्रत्‍येक ड्राइव्‍हला आनंददायी करणाऱ्या इंटेलिजण्‍ट तंत्रज्ञानांची श्रेणी अशा वैशिष्‍ट्यांसह सोयीसुविधा वाढवण्‍यात आली आहे. नवीन पंच प्रवाशांना आनंद देण्‍यासोबत रस्‍त्‍यावर आत्‍मविश्वास, आरामदायीपणा व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह लक्ष वेधून घेण्‍यास सक्षम करते.

कमांड मॅक्‍स क्षमता

नवीन पंच अद्वितीय वैविध्‍यता आणि नाविन्‍यतेसह निर्माण केलेल्‍या सब-कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. अधिक कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही एसयूव्‍ही पॉवरट्रेन पर्यायांचा अद्वितीय पोर्टफोलिओ देते, ज्‍यामुळे ग्राहक कार्यक्षमता व क्षमतेनुसार पेट्रोल, सीएनजी आणि मॅन्‍युअल ट्रान्‍समिशनसह विभागातील प्रथम व दर्जात्‍मक आयटर्बो पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट्समधून निवड करू शकतात. या एसयूव्‍हीच्‍या प्रभुत्‍वामध्‍ये श्रेणीमधील प्रथम आयसीएनजी तंत्रज्ञानासह एएमटी अधिक भर करते, ज्‍यामधून तडजोड न करणारी वैविध्‍यता मिळते.

या एसयूव्‍हीमध्‍ये १.२ लिटर टर्बाचार्ज्‍ड आयटर्बो रेव्‍होट्रॉन इंजिन आहे, जे अधिक बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे. दर्जात्‍मक पॉवर-टू-वेट रेशिओसह ही एसयूव्‍ही उत्‍साहवर्धक कार्यक्षमता व आत्‍मविश्वासपूर्ण ड्रा‍यव्हिंग क्षमतेची खात्री देते, ज्‍यामुळे शहरातील रस्‍ते किंवा महामार्गांवर अद्वितीय ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो. दरम्‍यान, प्रगत आयसीएनजी तंत्रज्ञान व्‍यावहारिकतेबाबत तडजोड न करता अधिक कार्यक्षमतेची खात्री देते, ज्‍याचे श्रेय इंटेलिजण्‍ट ट्विन-सिलिंडर नाविन्‍यतेला जाते, जे बूट स्‍पेस वाढवते, तसेच प्रीमियम वैशिष्‍ट्ये कायम ठेवते.

कमांड सेफ्टी

अल्‍फ्रा-आर्क आर्किटेक्‍चरवर डिझाइन करण्‍यात आले आणि अल्‍ट्रा हाय स्‍ट्रेन्‍थ स्‍टीलसह अधिक मजबूत करण्‍यात आलेली नवीन पंच टाटा सेफ्टी ड्रोम या ३६० डिग्री शील्‍डद्वारे सुरक्षित आहे, जे समकालीन सुरक्षितता मानकांपलीकडे अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ९५ हून अधिक सक्रिय व निष्क्रिय सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह नवीन पंच खात्री देते की, कुटुंब अधिक सुरक्षिततेसह आनंददायी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.

प्रवासाला सुरूवात करताच प्रत्‍येक प्रवसी सुरक्षित असण्‍याची खात्री मिळते. प्रमाणित म्‍हणून सहा एअरबॅग्‍ज, तसेच पेल्विस-थोरॅक्‍स साइड एअरबॅग्‍ज, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) खडतर प्रदेशांमध्‍ये देखील नियंत्रित ड्रायव्हिंगची खात्री देतात. ऑटो हेडलॅम्‍प्‍स व रेन-सेन्सिंग वायपर्ससह ड्रायव्हिंग सोपे बनते, तर ३-पॉइण्‍ट ईएलआर सीटबेल्‍ट्ससह सर्व सीट्समध्‍ये रिमाइंडर्स प्रत्‍येक प्रवासीसाठी सीटबेल्‍ट उपलब्‍ध असण्‍याची खात्री देते. भारतातील प्रत्‍येक प्रदेशामध्‍ये ड्रायव्हिंगसाठी सुसज्‍ज असलेल्‍या या एसयूव्‍हीमध्‍ये हिल होल्‍ड कंट्रोल आणि हिल डिसेंट कंट्रोल आहे, जे अद्वितीय आत्‍मविश्वास देतात, याला पूरक रिअर डिफॉगर, रिअर वायपर व वॉश आहे, ज्‍यासह नवीन पंच कोणत्‍याही वातावरणासाठी सुसज्‍ज आहे.

नवीन पंच सुरक्षितता मापदंडांची पूर्तता करण्‍यासह त्‍यांना नव्‍या उंचीवर घेऊन जाते. ५-स्‍टार बी-एनसीएपी रेटिंग आणि टाटा सेफ्टी

डोमद्वारे सुरक्षिततेसह प्रत्‍येक प्रवासाचा आत्‍मविश्वासाने आणि अधिक सुरक्षिततेसह आनंद घेता येतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments