Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांची मंजुरी

पिंपरी, दि. १४ जानेवारी २०२६ : – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आज मंजुरी दिली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

 

या आराखड्यानुसार मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधण्यात येत असून, यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

 

मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारण्यात आलेला आहे.

 

मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

 

मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिल्या

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments