Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआयबीआयच्या 14व्या वार्षिक अधिवेशनात इश्युअर्ससाठी हँडबुक आणि मर्चंट बँकर कंप्लायन्स रेफरन्सरचे सेबीचे...

एआयबीआयच्या 14व्या वार्षिक अधिवेशनात इश्युअर्ससाठी हँडबुक आणि मर्चंट बँकर कंप्लायन्स रेफरन्सरचे सेबीचे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, 19 जानेवारी, 2025: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाने (एआयबीआय) आपल्या 14 व्या वार्षिक अधिवेशनाचे यशस्वीपणे आयोजन केले. वरिष्ठ नियामक, मार्केटमधील प्रमुख नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि गुंतवणूक बँकिंग व्यावसायिकांसह 1500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

 

 

“आयपीओ इंडिया: जागतिक भांडवलाचे प्रवेशद्वार, शाश्वत वाढ, विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित या अधिवेशनात, जागतिक भांडवल प्रवाहासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत शाश्वत आर्थिक वाढीचा एक प्रमुख प्रवर्तक म्हणून भारतातील प्राथमिक मार्केट्सना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

 

 

सेबीचे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे यांच्यासह एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिषकुमार चौहान, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुंदररमण राममूर्ती, एआयबीआयचे अध्यक्ष श्री. महावीर लुनावत आणि इतर प्रमुख मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित होते. सेबी, स्टॉक एक्स्चेंज, मालमत्ता व्यवस्थापक, मर्चंट बँकर आणि इश्युअर्सच्या वरिष्ठ नेतृत्वाची उपस्थिती ही जागतिक स्तरावर भारताच्या भांडवली बाजाराचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.

 

 

या अधिवेशनात भांडवल निर्मितीच्या संपूर्ण जीवनचक्राचा आढावा घेणारी प्रभावी प्रमुख भाषणे, अनौपचारिक चर्चा आणि पॅनल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. भांडवल निर्मितीमध्ये स्टॉक एक्स्चेंजची भूमिका, एसएमई आयपीओ, भांडवल निर्मितीचे माध्यम म्हणून म्युच्युअल फंड आणि बाजारात प्रवेश सुलभ करण्यासाठी तसेच आयपीओ मार्केटमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी असलेल्या सुधारणांवर प्रमुख सत्रांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भारताच्या दीर्घकालीन भांडवली बाजाराच्या दृष्टिकोनावरील एका विशेष सत्रामध्ये, आयपीओ सुधारणांना शाश्वत वाढ आणि आर्थिक लवचिकतेच्या व्यापक राष्ट्रीय अजेंड्याशी जोडण्यात आले.

 

 

मर्चंट बँकिंग परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आणि भारताच्या भांडवली बाजाराच्या निरंतर वाढीला पाठिंबा देण्यासाठी डिझाइन केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे एआयबीआयने अनावरण केले, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

 

 

· ऑफर कागदपत्रांची तयारी : मानक पद्धती आणि खुलासे – ऑफर कागदपत्रे तयार करण्यातील क्षमता सुधारण्यासाठी प्रमुख मानक निरीक्षणांवर प्रकाश टाकणारा एक अद्ययावत संदर्भ

 

· इश्युअर्ससाठी हँडबूक – एसएमई सूचीकरणासाठी नियामक आणि प्रक्रियात्मक आवश्यकतांसाठी एक सर्वसमावेशक मार्गदर्शक

 

· गुंतवणूकदार हँडबूक – गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भांडवली बाजार आणि सार्वजनिक इश्यू प्रक्रियांसाठी एक सुलभ मार्गदर्शक

 

· एआयबीआय आणि इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट असोसिएशन (आयसीएमए), लंडन यांच्यातील सामंजस्य करार – जागतिक सहकार्य आणि क्षमता बांधणीला चालना देण्याच्या उद्देशाने

 

· गुंतवणूकदार-केंद्रित प्रॉस्पेक्ट्स नेव्हिगेशन मार्गदर्शक – माहिती उघड करण्यासाठी आणि माहितीपूर्ण सहभाग वाढवण्यासाठी डिझाइन केलेले

 

· भांडवल निर्मितीवरील श्वेतपत्रिका – तरलतेचे कल, भांडवलाच्या गरजा आणि १० ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे भारताच्या प्रवासाचे परीक्षण

 

· एआयबीआयचे दुसरे वार्षिक मासिक – उद्योगाच्या दृष्टीने प्रमुख घडामडी, नियामक अपडेट्स, मार्केटमधील डेटा आणि एआयबीआयच्या उपक्रमांचा समावेश आहे

 

· मर्चंट बँकर कम्प्लायन्स रेफरन्सर – मर्चंट बँकरसाठी एक नियोजनबद्ध साधन

 

· गुंतवणूकदार जागरूकता व्हिडिओ – गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारा तसेच तक्रार निवारणाबद्दल मार्गदर्शन करणारा व्हिडीओ

 

· शॅडो आर्ट – माहितीपूर्ण गुंतवणूकदार: भारताच्या विकसित होत असलेल्या भांडवली बाजारांना आधार देणारी शिस्त, विश्वास, लवचिकता आणि पारदर्शकता या मूल्यांवर प्रकाश टाकणारे एक प्रतीकात्मक सादरीकरण

 

या 14व्या वार्षिक अधिवेशनात एआयबीआयचे अध्यक्ष आणि पॅन्टोमॅथ कॅपिटलचे सीएमडी श्री. महावीर लुनावत म्हणाले, “भारत एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे, जिथे सतत वाढत असलेल्या गुंतवणूकदार वर्गामुळे भांडवली बाजार अधिक मजबूत होत आहेत. एक मजबूत गुंतवणूक संस्कृती निर्माण करण्यावर आणि उत्तम भांडवल निर्मितीसाठी ज्ञान तसेच माहितीची उपलब्धता सुलभ करण्यावर आमचे प्रयत्न निरंतर केंद्रित आहेत. हे उपक्रम म्हणजे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

 

 

14व्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने भांडवली मार्केटची दीर्घकालीन वाढ मजबूत करण्यासाठी, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि भारतातील भांडवली बाजारांमध्ये शाश्वत वाढीला पाठिंबा देण्यासाठी नियामक, स्टॉक एक्स्चेंज आणि बाजार सहभागींसोबत जवळून काम करण्याच्या AIBI च्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यात आली. प्राथमिक बाजारपेठा विकसित होत असताना, भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आकांक्षांशी सुसंगत अशी एक लवचिक, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भांडवली बाजारपेठेची चौकट तयार करण्यास मदत करण्याच्या आपल्या संकल्पाचा AIBI ने पुनरुच्चार केला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments