भारतातील रस्त्यांसाठी युरोपियन तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला पुढे नेत, नवीन Kushaq #EasytoLove आहे
मिरववण्यासाठी सोपी: लाँचच्या वेळीपासून उपलब्ध असलेले Monte Carlo बॅज; हे Škoda च्या मॉडर्न सॉलिड डिझाइन तत्त्वज्ञानाचा अर्थ स्पष्ट करते, त्याचबरोबर ब्रँडचा वैशिष्ट्यपूर्ण युरोपियन डिझाइन वारसा पुढे नेते
चालवायला सोपी: सर्व व्हेरियंटमध्ये टर्बोचार्ज्ड इंजिनसह, अस्सल ऑटोमॅटिक गाड्यांची श्रेणी ऑफर करते
सेगमेंट-मधील पहिले ट्रान्समिशन: शक्तिशाली पण कार्यक्षम 1.0 TSI इंजिनसोबत पूर्णपणे नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक सादर केले आहे, तसेच सहा-स्पीड मॅन्युअल आणि 1.5 TSI इंजिनसह सिद्ध सात-स्पीड DSG ऑटोमॅटिकही उपलब्ध आहे.
वापरण्यास सोपी: Kushaq मध्ये प्रथमच सादर करण्यात आलेले, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच सादर करण्यात आलेले रिअर सीट मसाज फंक्शन आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह आरामदायी अनुभव अधिक चांगला होतो
बेस व्हेरिएंटपासूनच अनेक वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून उपलब्ध: अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक सनरूफ, क्लायमेट्रॉनिक ऑटो AC, रेन-सेन्सिंग वायपर्स, मागील वायपर आणि डिफॉगर, ऑटो-डिमिंग IRVM, LED हेडलॅम्प्स आणि टेललॅम्प्स, इत्यादी
विश्वास ठेवण्यास सोपी: या गाडीला 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मिळाले आहे; ही गाडी सहा एअरबॅग्ज आणि 25त स्वरूपात सुसज्ज आहे, आणि टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये ही वैशिष्ट्ये 40 पर्यंत आहेत.
घेण्यासाठी सोपी: सर्वोत्तम दर्जाची 4 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्स, तसेच 4 मोफत लेबर सर्व्हिसेसचा समावेश असलेल्या नवीन Škoda Super Care पॅकेजच्या नेतृत्वासह
प्री-बुकिंग आणि डिलिव्हरी: Škoda Auto India च्या अधिकृत वेबसाइटवर नवीन Kushaq साठी ₹ 15,000 मध्ये बुकिंग सुरू आहे; डिलिव्हरी मार्च 2026 च्या अखेरीस सुरू होईल
कोची, जानेवारी 20, 2026 – Škoda Auto India ने नवीन Kushaq सादर केली आहे, जी मूल्य, सुरक्षितता आणि गतिशीलता यांची नवीन व्याख्या तयार करते आणि युरोपियन तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या धोरणाला पुढे नेते. Kushaq ही इंडिया 2.0 धोरणांतर्गत ब्रँडची पहिली कार असून या कारने भारतात कंपनीच्या वाढीला मोठी चालना दिली आहे. सगळ्यात नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, रेअर सीट मसाज फंक्शन आणि इतर अनेक नवीन वैशिष्ट्ये व स्टॅंडर्ड उपकरणांसारख्या सेगमेंटमधील पहिल्या तंत्रज्ञानासह, नवीन Kushaq भारतीय रस्त्यांवर युरोपियन अभियांत्रिकी अधिक सुलभ बनवण्याच्या Škoda Auto India च्या धोरणाचे पालन करते.
Škoda Auto चे CEO क्लॉस झेलमर म्हणाले, “Škoda Auto च्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये वाढ करण्याच्या धोरणासाठी भारत एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, या गोष्टीवर अपडेटेड Kushaq शिक्कामोर्तब करते. Kushaq ने निर्यातीतून तिचे स्थान भारतातील ग्राहकांमध्ये आणि ASEAN व मध्य पूर्वेकडील देशांमध्ये वेगाने निर्माण केले आहे. आता या मॉडेलच्या एकूण मूल्य प्रस्तावासाठी आम्ही पुढील मापदंड निश्चित करत आहोत. या अपडेटमध्ये मॉडर्न सॉलिड डिझाइन घटकांबरोबरच इन्फोटेनमेंट आणि ड्रायव्हर असिस्टन्सची विस्तृत वैशिष्टे समाविष्ट आहेत, ज्यामुळे अधिक आराम आणि सुरक्षितता मिळते. Kodiaq आणि Kylaq यांच्यासोबत, Škoda Auto भारतीय बाजारपेठेत SUV वाहनांचा एक असा ताफा सादर करत आहे, जो महत्त्वाच्या विभागांना आणि किमतींच्या श्रेणींना लक्ष्य करतो. Kushaq ला पुढील स्तरावर नेल्याने युरोपबाहेरील आमच्या सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठेत अतिरिक्त मागणी आणि पुढील वाढीची संधी निर्माण होते.”
Škoda Auto India चे ब्रँड डायरेक्टर आशीष गुप्ता, म्हणाले, “युरोपियन तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि ते संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी अधिक सुलभ करणे हे स्कोडामध्ये आमचे ध्येय आहे. आज शहरे आणि प्रदेशांमधील सीमा धूसर होत असून आकांक्षा एकमेकांत मिसळत आहेत. ग्राहकांच्या या बदलत्या आवडीनिवडींची पूर्तता करणारी उत्पादने सादर करून आम्ही या अपेक्षा पूर्ण करत आहोत. आज नवीन Kushaq च्या अनावरणासोबत, आम्ही आमच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ‘खऱ्या ऑटोमॅटिक’ गाड्यांची श्रेणी सादर करण्याचा आमचा वारसा पुढे नेत आहोत एक अशी SUV जी आमच्या सिद्ध केलेल्या युरोपियन अभियांत्रिकीच्या नेतृत्वाखाली, सर्वात महत्त्वाची सुरक्षा, आराम, डिझाइन आणि सोयीसुविधांची वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून देते. आमच्या ग्राहकांचे आम्ही सतत ऐकत असतो, आणि नवीन Kushaq हे आमच्या वाढत्या Škoda कुटुंबासाठी आमचा पोर्टफोलिओ आधुनिक आणि संबंधित ठेवण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.”
आवडण्यास सोपी. भारतासाठी बनवलेले, भारतात बनवलेले
2021 मध्ये सादर झालेली ‘Kushaq’, ज्याचे नाव ‘सम्राट’ या संस्कृत शब्दावरून घेतले आहे, ही इंडिया 2.0 धोरणांतर्गत भारतीय बाजारपेठेत Škoda Auto चे पहिले उत्पादन होते. ही MQB-A0-IN प्लॅटफॉर्ममधीलल पहिली कार होती, जी संघांनी परवडणारी आणि देखभाल खर्चाचा विचार करून भारत आणि झेक प्रजासत्ताकमध्ये विकसित केली होती. नवीन Kushaq अनेक नवीन सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्यांसह हा वारसा पुढे नेत, व्हेंटिलेटेड इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, सेन्सर्ससह रेयर-व्ह्यू कॅमेरा, वायरलेस चार्जिंग यांसारखी आधीच्या मॉडेलमधील सर्व व्यावहारिक वैशिष्ट्येही पुढे कायम ठेवत आहे. भारतीय बाजारातील सुरुवातीच्या Škoda SUVपैकी एक असलेली Kushaq ही गाडी आज Kodiaq आणि Kylaq या गाड्यांना पूरक ठरत आहे. यामुळे, Škoda Auto India कडे SUV गाड्यांचा एक असा ताफा आहे, जो प्रत्येक आकांक्षा आणि किमतीच्या श्रेणीची पूर्णपणे उतरतो.
आधुनिक आणि आकर्षक डिझाइनमुळे सहजपणे मिरवता येण्यासारखे. Monte Carlo बॅजच्या नेतृत्वाखाली
आता Kushaq मध्ये एक अगदी नवीन फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे, ज्यामध्ये क्रोम पट्ट्या आणि एक इल्युमिनेटेड लाइट बँड आहे. पुढच्या बाजूला पूर्णपणे नवीन LED हेडलाइट्स, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि LED फॉग लॅम्प्स देखील आहेत. मागील बाजूस सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटरसह नवीन कनेक्टेड टेललाइट्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस एक लक्षवेधी दिसून येणारे वैशिष्ट्य म्हणजे जोडलेल्या टेललाइट्सना जोडणारी, प्रकाशमान ‘Škoda’ अक्षरे. Kushaq च्या बाजूला मजबूत, सुबक रेषा आहेत, तसेच व्हील आर्च आणि सिल्सभोवती क्लॅडिंग दिलेले आहे. सर्व व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील्स स्टॅंडर्ड दिले आहेत, ज्यामुळे गाडीला एक स्पोर्टी लुक आणि रस्त्यावर आकर्षक दिसते. या अपडेटमध्ये Kushaq चे SUV वैशिष्ट्य आहे तसे ठेवण्यात आले आहे, आणि ‘मॉडर्न सॉलिड’ डिझाइनमुळे तिची शैली टिकून राहते, ज्यामुळे ती रस्त्यावर किंवा रस्त्याबाहेर एक दणकट, तरीही आकर्षक गाडी ठरते. ही SUV आता तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध होईल – शिमला ग्रीन, स्टील ग्रे आणि चेरी रेड, तसेच कॅंडी व्हाइट, कार्बन स्टील, ब्रिलियंट सिल्व्हर, लावा ब्लू आणि डीप ब्लॅक यांसारखे सध्याचे पर्यायही उपलब्ध असतील. पहिल्यांदाच, या व्हेरिएंटच्या वाढत्या मागणीनुसार, Monte Carlo बॅज विक्रीच्या सुरुवातीपासूनच उपलब्ध करून दिला जाईल, ज्यामुळे गाडीच्या स्टाइलमध्ये आणखी भर पडेल.
खऱ्या ऑटोमॅटिक गाड्यांच्या श्रेणीमुळे चालवायला सोपी
तिची अप्रतिम ड्रायव्हिंग वैशिष्ट्ये आणि 188 mm च्या कमाल ग्राउंड क्लिअरन्ससह, नवीन Kushaq खराब रस्त्यांवरून जाण्याच्या क्षमतेसह उच्च वेगातील तिची स्थिरता कायम राखते. यात या सेगमेंटमधील प्रथमच सादर करण्यात आलेला सर्व-नवीन आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. हे ट्रान्समिशन कार्यक्षम, शक्तिशाली आणि सिद्ध झालेल्या 1.0 TSI इंजिनसोबत जोडलेले आहे, जे 85kW शक्ती आणि 178Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल सोबतही उपलब्ध आहे. चांगल्या परफॉर्मन्सची आवड असलेले 110kW आणि 250Nm टॉर्क असलेल्या 1.5 TSI इंजिनची निवड करू शकतात. अॅक्टिव्ह सिलेंडर टेक्नॉलॉजी असलेले हे चार-सिलेंडर टर्बो इंजिन फक्त वेगवान गिअर बदलणाऱ्या सात-स्पीड DSG ट्रान्समिशनसोबत जोडलेले आहे. नवीन Kushaq मध्ये, 1.5 TSI मॉडेलमध्येही सर्व चाकांना डिस्क ब्रेक मिळतात. याद्वारे, Škoda Auto India ने नाविन्यपूर्ण आठ-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि सिद्ध झालेल्या 7-स्पीड DSG आणल्याने, खरे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स प्रदान करण्याची त्यांची रणनीती सुरू ठेवली आहे.
अनुभवाच्या बाबतीत सोपी
नवीन Kushaq च्या आतील भागाला आकर्षक बनवण्यासाठी, संपूर्ण गाडीमध्ये एक अगदी नवीन पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-कलर अॅम्बियंट लाइटिंग आहे. नवीन Kushaq मध्ये चालक आणि पुढील प्रवाशासाठी व्हेंटिलेशन असलेले सिक्स-वे इलेक्ट्रिक सीट्स, तसेच केबिनमध्ये मंत्रमुग्ध करणारा अनुभव देण्यासाठी सहा स्पीकर्स आणि सबवूफर असलेली Škoda साउंड सिस्टीम देण्यात आली आहे. यात 491 लिटरची प्रशस्त बूट स्पेस मिळते, जी वाढवून 1,405 लिटरपर्यंत करता येते, ज्यामुळे दैनंदिन वापरातील उपयुक्तता वाढते. क्लायमेट्रॉनिक ऑटो AC, तसेच इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो-डिमिंग IRVM, रेन-सेन्सिंग वायपर्स, रेअर वायपर, रेअर डिफॉगर आणि 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये आता स्टँडर्ड म्हणून दिली आहेत.
उच्च व्हेरियंट्समध्ये 10.25-इंचाच्या (26.03 सेमी) डिजिटल कॉकपिटमुळे चालकाचा अनुभव अधिक चांगला होतो. नवीन Kushaq च्या मध्यम व्हेरियंटमध्ये 8-इंचाचे (20.32 सेमी) डिजिटल कॉकपिट मिळते, ज्यामुळे ड्रायव्हिंगची अधिक चांगली माहिती उपलब्ध होते.
Google द्वारे समर्थित AI कंपॅनियन
नवीन Kushaq मध्ये 10.1-इंचाची (25.6 सेमी) इन्फोटेनमेंट स्क्रीन देखील आहे, ज्यात वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ची सुविधा आहे ही सिस्टीम नेक्स्ट-जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टीमद्वारे आधुनिक बनवण्यात आली असून भारतीय ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समर्थित एक परिवर्तनकारी इन-कार डिजिटल अनुभव प्रदान करते. प्रगत डिजिटल आर्किटेक्चरवर आधारित ही नवीन सिस्टीम कार्यक्षमता, कनेक्टिव्हिटी आणि सहजसोप्या ग्राहक संवादात वाढ करते, ज्यामुळे आधुनिक भारतीय ड्रायव्हिंगच्या गरजांनुसार तयार केलेला एक अखंड आणि आकर्षक इन-केबिन अनुभव मिळतो.
याच्या केंद्रस्थानी, Google Automotive AI Agent द्वारे समर्थित एक प्रगत व्हॉइस असिस्टंट आहे. हा AI एजंट Gemini ला वाहनामध्ये आणतो, ज्यामुळे आमच्या ग्राहकांसाठी एक नेक्स्ट-जनरेशन, कॉंटेक्स्ट-अवेअर व्हॉइस असिस्टन्स सिस्टीम तयार होऊन ती बातम्या आणि ट्रेंड्ससारखी रिअल-टाइम माहिती थेट वाहनात आणते, तसेच संगीत, कॉल, क्लायमेट कंट्रोल आणि इतर गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी हँड्स-फ्री ऑपरेशन सक्षम करते. स्थानिक गरजांची सखोल समज घेऊन विकसित केलेली ही इन्फोटेनमेंट सिस्टीम भारतीय इंग्रजी उच्चारशैली ओळखते, ज्यामुळे सर्वसमावेशक आणि सहजसाध्य व्हॉइस इंटरॅक्शन सुनिश्चित होते. याद्वारे, हा ब्रँड जागतिक तंत्रज्ञानाचा स्थानिक उपयुक्ततेशी मेळ करतो आणि भारतात अधिक स्मार्ट ड्रायव्हिंगसाठी नवीन मापदंड स्थापित करतो.
विश्वास ठेवण्यास सोपी
नवीन Kushaq ने सुरक्षिततेला प्राधान्य देणे सुरूच ठेवले असून प्रत्येक ग्राहकाला त्याच्या फाइव्ह-स्टार ग्लोबल NCAP मानकांबद्दल खात्री मिळते. याच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टॅंडर्ड म्हणून 25 पेक्षा जास्त सक्रिय आणि निष्क्रिय सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यात सहा एअरबॅग्जचा समावेश आहे, आणि उच्च व्हेरिएंट्समध्ये 40 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. Škoda Auto India ने नवीन Kushaq मधील सर्व व्हेरियंट्समध्ये रेअर वायपर, रेअर डिफॉगर, ऑटोमॅटिक रेन-सेन्सिंग वायपर आणि ऑटो-डिमिंग IRVM यांसारखी प्रमुख वैशिष्ट्ये स्टँडर्ड म्हणून देऊन सर्व प्रकारच्या हवामानातील दृश्यमानता आणि सुरक्षितता सुनिश्चित केली आहे. याद्वारे, Škoda Auto India ने सर्व परिस्थिती आणि हवामानात चालकाला सर्वोत्तम दृश्यमानता आणि किमान दृश्य ताण पडेल याची खात्री करून सक्रिय सुरक्षा, निष्क्रिय सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक सुरक्षा यांची अभियांत्रिकी बनवली आहे.
घेण्यासाठी सोपी: Škoda Super Care पॅकेज
नवीन Kushaq, अखंड मालकीचा अनुभव देण्याच्या Škoda Auto India च्या तत्त्वज्ञानाला पुढे नेते. आता ही Škoda Super Care पॅकेजसह येते: यामध्ये सर्वोत्तम दर्जाची 4 वर्षे किंवा 100,000 किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी, तसेच 4 वर्षांची रोडसाइड असिस्टन्स सेवा मिळते, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी मनःशांती लाभते. याव्यतिरिक्त, ग्राहकांना दोन वर्षांपर्यंत किंवा 30,000 किलोमीटरपर्यंत चार मोफत लेबर सर्व्हिसेसचा लाभ मिळतो. वॉरंटी आणखी दोन वर्षांसाठी वाढवता येते, ज्यामुळे एकूण कव्हरेज सहा वर्षांपर्यंत होते. याला पुढे सहा वर्षांची गंजरोधक वॉरंटी आणि तीन वर्षां
च्या पेंट वॉरंटीची जोड दिली आहे.
*****


