पुणे, जानेवारी २१, २०२६: भारतातील प्रोफेशनल्सनी परिवर्तनासाठी मोठ्या महत्त्वाकांक्षेसह नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे. २०२६ मध्ये ७२ टक्के प्रोफेशनल्स नवीन पदाचा शोध घेत आहेत हे लिंक्डइनच्या नवीन संशोधनामधून निदर्शनास आले आहे. पण, एक-तृतीयांशपेक्षा अधिक प्रोफेशनल्सना झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानासह नोकरी करण्यास आवश्यक असलेल्या कौशल्यांसाठी (३८ टक्के) आणि आजच्या वाढत्या स्पर्धेदरम्यान वरचढ ठरण्यासाठी (३८ टक्के) तयार नसल्याचे देखील वाटते.
प्रोफेशनल्सना या अनिश्चिततेमधून मार्ग काढण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनने आपली जॉब्स ऑन द राइज २०२६ लिस्ट जारी केली आहे. पुण्यामध्ये एआय इंजीनिअर नोकरीमधील झपाट्याने वाढ होत असलेले पद ठरले आहे, ज्यामधून तंत्रज्ञान व उद्योग नाविन्यतेसाठी केंद्र म्हणून शहराची वाढती भूमिका दिसून येते. याव्यतिरिक्त, लिस्टमध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे, जसे जनरल मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट (#2), अंडररायटर (#3), मार्केटिंग कन्सल्टण्ट (#4) आणि लीगल एक्झिक्युटिव्ह (#5), ज्यामधून शहरातील विकसित होत असलेल्या रोजगार बाजारपेठेत व्यवसाय विकास, आर्थिक सेवा, मार्केटिंग, कायदा व नेतृत्व भूमिकांमधील वाढ दिसून येते.
लिंक्डइन करिअर तज्ञ आणि लिंक्डइन इंडिया न्यूजच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी म्हणाल्या, ”पुण्यातील रोजगार बाजारपेठेला येथील स्थापित उद्योग व उदयोन्मुख नाविन्यतेच्या संयोजनामुळे आकार मिळाला आहे, ज्यामुळे विविध प्रोफेशनल्ससाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. क्षेत्रे व कार्यांमधील भूमिकांमध्ये बदल होत असताना नियोक्ते पदांशी जुळून जाण्याची क्षमता असलेल्या, मुलभूत क्षमतांसह एआयचे ज्ञान असलेल्या, आपल्या मुलभूत कौशल्यांच्या माध्यमातून प्रभाव घडवून आणण्याची क्षमता असलेल्या आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडू शकणाऱ्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत. आज तंत्रज्ञानासोबत उत्पादन, फायनान्स व सल्लागार क्षेत्रांमध्ये देखील भरतीची मागणी वाढली आहे.”
भारतातील प्रोफेशनल्स सोईस्करपणे एआयचा वापर करतात, पण भरती मध्ये एआयचा वापर करण्याबाबत अनिश्चित आहेत
लिंक्डइनच्या संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील ९४ टक्के प्रोफेशनल्स रोजगार शोधण्यामध्ये सोईस्करपणे एआयचा वापर करतात, पण जवळपास अर्ध्या (४८ टक्के) प्रोफेशनल्सना हायरिंगमध्ये एआयचा वापर करताना वरचढ कसे ठरावे हे माहित नाही. त्यांच्यापैकी ५४ टक्के प्रोफेशनल्स म्हणतात की, नोकरी देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एआय अडथळा ठरू शकतो. या समस्या असताना देखील ६५ टक्के प्रोफेशनल्सचा विश्वास आहे की, एआयमुळे नोकरी देणाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये सुधारणा होऊ शकते, तसेच नोकरी देणारे व उमेदवार यांच्यामधील परस्परसंवादांमधील तफावत दूर करण्यास मदत होऊ शकते.
लिंक्डइनचे एआय टूल्स जॉब सर्च आणि रोल मॅचिंगमध्ये अधिक सुधारणा करत आहेत.
लिंक्डइन एआय टूल्सची व्यापक श्रेणी देखील प्रदान करतेज्यामध्ये एआय-पॉवर्ड जॉब सर्च (AI-powered job search), जे सदस्यांना त्यांच्या स्वत:च्या भाषेमध्ये रोजगार शोधण्याची, तसेच त्यांनी कदाचित विचार न केलेल्या भूमिका सापडण्याची सुविधा देते. हे टूल आता जागतिक स्तरावर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश व पोर्तुगीज या भाषांमध्ये सादर करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर १.३ दशलक्षहून अधिक सदस्य दररोज या टूल्सचा वापर करत आहेत आणि २५ दशलक्षहून अधिक सदस्य आठवड्याला शोध घेण्यास नवीन जॉब सर्च अनुभव घेत आहेत. संबंधित पदे शोधल्यानंतर तुम्ही कोणती पदे तुमची कौशल्ये व पात्रतांशी जुळू शकतात, हे जाणून घेण्यासाठी लिंक्डइनच्या जॉब मॅच वैशिष्ट्याचा (LinkedIn’s job match feature) वापर करू शकता, ज्यामुळे तुम्ही योग्य संधींसाठी अर्ज करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता, तुम्ही पदासाठी पात्र असता आणि निवड होण्याची शक्यता जास्त असते.
पुण्यातील टॉप १० जॉब्स ऑन द राइज
एआय इंजीनिअर
जनरल मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट
अंडररायटर
मार्केटिंग कन्सल्टण्ट
लीगल एक्झिक्युटिव्ह
फायनान्शियल प्लॅनिंग अॅनालिस्ट
वाइस प्रेसिडेंट सप्लाय चेन
अकाऊंट मॅनेजर
रिसर्च इन्स्ट्रक्टर
सेल्स डायरेक्टर


