Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedब्राह्मण समाजाने समाजकारणाबरोबरच सक्रीय राजकारणात उतरायला हवे - माधव भांडारी*

ब्राह्मण समाजाने समाजकारणाबरोबरच सक्रीय राजकारणात उतरायला हवे – माधव भांडारी*

 

 

पुणे, दि. 27 – सर्व जाती, संप्रदाय, पंथातील समाजाला सोबत घेत आपल्या संघटनकौशल्याचा चांगला उपयोग करुन ब्राह्मण समाजाने सक्रीय समाजकारण करण्याबरोबरच राजकारणात देखील आपले स्थान बळकट करायला हवे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी आज येथे केले. सकल ब्राह्मण समाज, पुणे शहर यांच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ब्राह्मण नगरसेवकांच्या सन्मान व अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस राजेश पांडे, कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर व समन्वयक भालचंद्र कुलकर्णी व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्‍वजीत देशपांडे यांनी केले.

 

पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक पुनित जोशी, कुणाल टिळक, स्वरदा बापट, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, निवेदिता एकबोटे व पिंपरी-चिंचवडमधील मंदार देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धीरज घाटे व मानसी देशपांडे काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

 

यावेळी भांडारी पुढे म्हणाले की, समाजातून पुढे आलेल्या नेतृत्वाचा गौरव करणे म्हणजे समाजाच्या संघटनशक्तीचा गौरव आहे. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे. सुसंस्कारीत आणि सक्षम नेते तयार होण्यासाठी ब्राह्मण समाजाने देखील सक्रीयपणे राजकारणात यायला हवे. आपल्या संघटनकौशल्याबरोबरच बुध्दी, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय समाजाल द्यायला हवा. सामाजिक कार्यात सक्रीयपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते राजकारणात येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ब्राह्मण समाजाने आपल्या कार्याने सर्व समाजाला आपलेसे केले पाहिजे.

 

यावेळी भालचंद्र कुलकर्णी म्हणाले की, ब्राह्मण समाजाच्या सरकारकडे विविध मागण्या आहेत, ज्यामध्ये पुण्यात भव्य परशुराम भवन निर्माण व्हावे, पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नांव देण्यात यावे, दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात यावी तसेच शनिवार वाडा आणि पर्वती देवस्थानची नूतनीकरण व्हावे, ज्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. सकल ब्राह्मण समाजाच्या व्यासपीठाखाली पुणे शहरातील 30 ब्राह्मण संस्था, संघटना एकत्रितपणे विविध कार्यक्रम, उपक्रम राबवतात.

 

सकल ब्राह्मण समाज समितीमध्ये आम्ही सारे ब्राह्मण, अ. भा. ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, याज्ञवल्क्य आश्रम, कर्‍हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती ब्राह्मण मंडळ, पुणे, विप्र फौंडेशन, सर्वशाखीय ब्राह्मण महासंघ, पौरोहित्य पुरोहित फौंडेशन, गौड सारस्वत ब्राह्मण संघ अशा सुमारे 30 ब्राह्मण संस्था, संघटना सदस्य आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री मंदार रेडे, विश्‍वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, मनोज तारे, ईशानी जोशी, पद्मा जोशी, ऋषिकेश सुमंत, सुनिल पारखी, राजेंद्र कुलकर्णी, नीता पारखी, माधुरी कुलकर्णी, मनोज पांचारीया आदींनी परिश्रम केले.

———

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments