Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरकडून अर्बन क्रूझर हायरीडरसाठी क्युरेटेड टेक पॅकेज सादर

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून अर्बन क्रूझर हायरीडरसाठी क्युरेटेड टेक पॅकेज सादर

प्रगत आराम आणि सोयीच्या वैशिष्ट्यांद्वारे इन-कॅबिन अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी डिझाइन केलेले

• अर्बन क्रूझर हायरीडरच्या सर्व ग्रेड्समध्ये उपलब्ध, ज्यामुळे ग्राहक कोणत्याही व्हेरियंटमध्ये टेक पॅकेज निवडू शकतात

पुणे, 28 जानेवारी 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज आपल्या लोकप्रिय एसयूव्ही अर्बन क्रूझर हायरीडरसाठी विशेषरित्या क्युरेट केलेले टेक पॅकेज सादर केले आहे. हे टेक पॅकेज दैनंदिन ड्रायव्हिंग अधिक आरामदायक आणि सोयीस्कर करण्यासाठी स्मार्ट आणि सहज तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले असून, प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित, कनेक्टेड आणि प्रीमियम बनवते.

अर्बन क्रूझर हायरीडरच्या सर्व व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या टेक पॅकेजमध्ये टोयोटाच्या तीन अस्सल अॅक्सेसरीजचा समावेश आहे:

• अॅम्बियंट लायटिंग: केबिनमध्ये सौम्य व सानुकूल करता येणारी प्रकाशयोजना देऊन अधिक प्रीमियम आणि आरामदायक वातावरण निर्माण करते.

• हेड्स-अप डिस्प्ले: वाहनाशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट डिस्प्लेवर दाखवतो, ज्यामुळे चालकाचे लक्ष रस्त्यावर राहते आणि सुरक्षितता वाढते.

• डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर / कार डॅश कॅमेरा: सतत रेकॉर्डिंगद्वारे सुरक्षितता वाढवतो आणि प्रत्येक प्रवासाचा विश्वासार्ह पुरावा देतो.

हे टेक पॅकेज देशभरातील सर्व टोयोटा डीलरशिप्सवर ₹29,499/- (एमआरपी) मध्ये उपलब्ध असेल.

बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवे मानदंड प्रस्थापित करत

2022 मध्ये लाँच झाल्यापासून अर्बन क्रूझर हायरीडरला त्याच्या आकर्षक डिझाइन, प्रगत हायब्रिड तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसाठी ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्टाईल, आराम आणि टिकाऊपणाचे उत्तम मिश्रण सादर करणारी ही एसयूव्ही आहे. टेक पॅकेजमुळे इन-कॅबिन अनुभव अधिक उंचावला गेला असून, मॉडेलची आकर्षकता अधिक वाढली आहे.

₹10.94 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होणाऱ्या किमतीसह, अर्बन क्रूझर हायरीडरने नुकतेच 2 लाख युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. ही एसयूव्ही बी-एसयूव्ही सेगमेंटमधील एक मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन म्हणून ओळख निर्माण करत असून, स्मूद आणि शांत ड्रायव्हिंग अनुभव देते. याचा सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन 40% अंतर आणि 60% वेळ इलेक्ट्रिक मोडमध्ये चालतो, जो 27.97 किमी/लीटरचे प्रभावी मायलेज देतो. पारंपरिक ड्रायव्हिंग पसंतीसाठी, निओ ड्राइव्ह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 2WD आणि 4WD पर्यायांसह उपलब्ध आहे.

या एसयूव्हीचा डिझाइन आत्मविश्वास दर्शवतो — क्रिस्टल अॅक्रिलिक ग्रिल, सिग्नेचर ट्विन एलईडी डीआरएल्स, स्कल्प्टेड बॉडी लाईन्स आणि 17-इंच अलॉय व्हील्ससह. केबिनमध्ये व्हेंटिलेटेड लेदर सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, 9-इंच टचस्क्रीन (वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो), वायरलेस चार्जिंग, यूएसबी चार्जिंग आणि 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. हे सर्व मिळून आधुनिक कुटुंबांसाठी आरामदायक, आधुनिक आणि टेक-सेवी अनुभव निर्माण करतात.

ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन अधिक मजबूत करत, कंपनी 66 एक्सक्लुसिव्ह अ‍ॅक्सेसरीज, 3 वर्षे / 100,000 किमी वॉरंटी (जी 5 वर्षे / 220,000 किमीपर्यंत वाढवता येते) आणि उद्योगातील आघाडीची 8 वर्षे / 160,000 किमी हायब्रिड बॅटरी वॉरंटी देते — ज्यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन विश्वासार्हता आणि पूर्ण मनःशां

ती मिळते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments