Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाधवानी फाऊंडेशनने २०३० पर्यंत २.५ दशलक्ष रोजगार निर्माण करण्‍यासाठी आणि ६ दशलक्ष...

वाधवानी फाऊंडेशनने २०३० पर्यंत २.५ दशलक्ष रोजगार निर्माण करण्‍यासाठी आणि ६ दशलक्ष व्‍यक्‍तींना रोजगार मिळवून देण्‍यासाठी राज्‍य व शहरामधील कार्यचालन टीममध्ये भर केली

फाऊंडेशन २०२६ मध्‍ये भारतातील गुंतवणूक जवळपास २५ टक्‍क्‍यांनी वाढवेल, तर भारतातील कर्मचाऱ्यांची संख्‍या जवळपास १० टक्‍क्‍यांनी वाढवेल, तसेच देशभरातील सर्व उपक्रम सुरू ठेवत रोजगार निर्मितीला गती देण्‍यासाठी राज्‍य व शहरांमधील अंमलबजावणी टीम्‍समध्‍ये वाढ करेल.

नवी दिल्‍ली, २८ जानेवारी २०२६: वाधवानी फाऊंडेशन ही उद्योजकता, कौशल्‍य, नाविन्‍यता व सरकारी डिजिटल परिवर्तनाच्‍या माध्‍यमातून रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करणारी जागतिक ना-नफा तत्त्वावर आधारित कंपनी भारतातील आपल्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. फाऊंडेशन उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्‍ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमधील १५ प्राधान्यक्रमाच्या शहरांमध्ये आपली अंमलबजावणी प्रक्रिया अधिक दृढ करत आहे.

उत्तम अंमलबजावणीच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम परिणाम वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे, जेथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्‍लॅटफॉर्म्‍सचा स्‍थानिक स्‍तरावर प्रभाव घडवून आणण्‍याची खात्री घेतली जात आहे. उत्तम परिणामांमध्‍ये वाढ म्‍हणजे अधिकाधिक स्‍थानिक रोजगार निर्माण केले जातील आणि अधिकाधिक स्‍थानिक व्‍यक्‍तींना रोजगार दिले जातील. या दृष्टिकोनामुळे जलद अंमलबजावणी, स्‍पष्‍ट जबाबदारी, तसेच स्‍थानिक नियोक्‍ते, कौशल्‍य संस्‍था व रोजगार निष्‍पत्तींमधील समन्‍वय शक्‍य होते.

हा टप्पा २०२५ मध्ये करण्‍यात आलेल्‍या उत्तम अंमलबजावणीच्या पायावर आधारित आहे. २०२५ मध्‍ये फाउंडेशनने भारतात ३०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली, ७,००० व्यवसायांना साह्य केले, १.२ लाख उद्योजकता विद्यार्थ्यांशी संलग्‍न झाले आणि रोजगार-केंद्रित कौशल्य विकासाद्वारे २.५ लाख तरुणांना रोजगारासाठी सुसज्‍ज केले. याव्यतिरिक्‍त, फाउंडेशनने शिक्षण मंत्रालयासोबत सहयोगाने एआय-सक्षम प्लॅटफॉर्म ‘माय करिअर अडवायजर’ लाँच केला, जो १५०० हून अधिक करिअर पर्यायांसाठी तरुणांना मोफत आणि वैयक्तिकृत करिअर मार्गदर्शन देतो.

नाविन्‍यपूर्ण उपक्रमांतर्गत फाऊंडेशनने वाधवानी इनोव्‍हेशन नेटवर्क मजबूत केले. तसेच १० इनोव्‍हेशन ट्रान्‍सलेशन सेंटर्स सुरू केली, ज्‍यामध्‍ये आयआयटी कानपूर (वाधवानी एआय अँड इंटेलिजण्‍ट सिस्‍टम्‍स हब) आणि आयआयटी बॉम्‍बे (वाधवानी हेल्‍थ अँड बायो हब) येथील दोन सुपर हब्‍सचा समावेश आहे. एकत्रित हे हब्‍स इनोव्‍हेशन परिसंस्‍थेमधील प्रत्‍येकी ५० हून अधिक ट्रान्‍सलेशन सेंटर्सना साह्य करतात. एकूण, १०० संशोधन प्रकल्‍पांना उत्‍पादन व स्‍टार्टअपच्‍या दिशेने विकसित करण्‍यात आले.

सहा केंद्रीय मंत्रालयांसाठी एआय प्रकल्प पूर्ण करण्यात आले. आशा (अन्‍न सहाय्यता होलिस्टिक एआय सोल्यूशन) उपक्रम लाँच करण्‍यात आला, ज्‍याद्वारे पब्लिक डिस्ट्रिब्‍युशन सिस्‍टम (पीडीएस) लाभार्थ्‍यांकडून अभिप्राय मिळवले जातात. आरोग्‍यसेवा, कृषी व शिक्षण क्षेत्रात ३० हून अधिक एआय सोल्‍यूशन्‍स तैनात करण्‍यात आले.

या गतीला अधिक वेग देत फाऊंडेशन २०२६ मध्‍ये भारतातील गुंतवणूक जवळपास २५ टक्‍क्‍यांनी वाढवणार आहे, तसेच भारतातील आपल्‍या कर्मचाऱ्यांची संख्‍या जवळपास १० टक्‍क्‍यांनी वाढवणार आहे. याकरिता राज्‍य व शहरामधील अंमलबजावणी टीम्‍समध्‍ये वाढ करण्‍यात येईल आणि सरकार, संस्‍था, नियोक्‍ते व स्‍थानिक परिसंस्‍थांसोबत सहयोग अधिक पक्का करण्‍यात येईल. अधिक प्रभावासाठी दुहेरी मॉडेलअंतर्गत कार्यरत फाऊंडेशनचे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्‍लॅटफॉर्म्‍स विकास व सातत्‍यता राखतील, तर राज्‍य व शहरामधील टीम्‍स प्रत्‍यक्षात डिलिव्‍हरी, समन्‍वय व जबाबदारीची भूमिका पार पाडतील. राज्‍य-स्‍तरावरील अंमलबजावणीला साह्य करण्‍यासाठी काही भूमिकांमध्‍ये मर्यादित बदल करण्‍यात येतील. सर्व उपक्रम सहयोगी व लाथार्थ्‍यांकरिता मोफतपणे सुरू राहतील.

वाधवानी फाऊंडेशनचे सीईओ व बोर्ड सदस्‍य डॉ. अजय केला म्‍हणाले:

”आमचे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्‍याचे आणि व्‍यक्‍तींच्‍या उदरनिर्वाहामध्‍ये वाढ करण्‍याचे मिशन आहे. २०२५ मधील प्रबळ पायाचा आधार घेत आम्‍ही २०२६ मध्‍ये भारतातील आमची गुंतवणूक वाढवत आहोत, तसेच आमची टीम देखील वाढवत आहोत, ज्‍यामुळे राज्‍य व शहरांमध्‍ये अंमलबजावणी अधिक उत्तम होईल. या पुढाकारामुळे निष्‍पत्तींना गती मिळेल, स्‍थानिक पातळीवर अधिक रोजगार निर्माण होतील आणि अधिकाधिक रोजगारासाठी सुसज्‍ज व्‍यक्‍तींना नोकऱ्या मिळतील. यासह आम्‍ही आमच्‍या २०३० ध्‍येयांच्‍या दिशेने वाटचाल सुरू ठेवू.”

प्रभाव निर्माण करण्‍यासह कायम राहणाऱ्या स्‍थानिक परिसंस्‍थांशी संलग्‍न होण्‍यावर लक्ष केंद्रित करत वाधवानी फाऊंडेशनने उद्योजकता, कौशल्‍य, एसएमबी विकास, नाविन्‍यता आणि सरकारी डिजिटल परिवर्तनामधील सर्व उपक्रमांप्रती आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे.


——–

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments