पुणे: टीजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरने अत्याधुनिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) आणि सी-आर्म सुविधेच्या उद्घाटनाद्वारे प्रगत आणि परवडणाऱ्या कर्करोग उपचारांना आधुनिकतेची जोड दिली आहे. या सुविधेमुळे गुंतागुंतीच्या कर्करोगावर उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी प्रभावी उपचार उपलब्ध होतील.
या अद्ययावत सुविधेत ८ आयसीयू बेड आणि ४ एचडीयू बेडचा समावेश आहे, ज्यामुळे रुग्णांना चोवीस तास देखरेख ठेवणे आणि त्यांना जलद वैद्यकीय प्रतिसाद देणे शक्य होईल. फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) च्या सहकार्यामुळे हा उपक्रम राबविने शक्य झाले असून या उपक्रमातंर्गत त्यांनी आयसीयू युनिटकरिता साहित्य आणि प्रगत सी-आर्म उपकरणं दान केली आहेत.
या सुविधेचे उद्घाटन फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे संचालक श्री. जनक छाब्रिया आणि सौ. राधिका छाब्रिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे सीएसआर प्रमुख श्री. रमेश लालवाणी आणि टीजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन देशमुख, डॉ. युनिट हेड संतोष साहू, डॉ. गौरव जसवाल, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विश्वास कौल; डॉ. ज्योती मेहता, डॉ. विवेक बांदे आणि डॉ. प्रद्युम्न ढाकेफळकर, सेंटरचे वैद्यकीय तज्ञ व कर्मचारी उपस्थितीत होते.
दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने वेळीच निदान, रुग्णांची विशेष काळजी आणि अचूक प्रक्रिया गरजेच्या आहेत. टीजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरद्वारे आयसीयू आणि सी-आर्म सुविधेच्या शुभारंभाने कर्करुग्णांना उपचारात नक्कीच मदत होईल.
टीजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये, कर्करोग रुग्णांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी आम्ही आमची पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. आयसीयू आणि सी-आर्म सुविधेचे उद्घाटन करत रुग्णांना प्रगत कर्करोग उपचार सुलभरित्या आणि परवडणाऱ्या
दरात उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या सहकार्याने, आम्ही सहानुभूती, वैद्यकीय उत्कृष्टतेसह उच्च-गुणवत्तेची ुपचार प्रदान करण्याचे आणि कर्करोगाच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर कुटुंबांना आधार देण्याचे आमचे ध्येय आहे,असे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन देशमुख यांनी स्पष्ट केले.
केंद्रप्रमुख डॉ. संतोष साहू सांगतात की, या आधुनिक सुविधांमुळे वेळीच उपचार, रुग्णांची विशेष देखभाल आणि सुरक्षित प्रक्रिया करणे शक्य होणार आहे, जे गुंतागुंतीच्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वा
चे आहे.


