Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन..

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन..

 

पिंपरी, दि. १ फेब्रुवारी २०२६ :- संत रविदास हे थोर संत, कवी तसेच सामाजिक एकात्मतेसाठी सतत कार्यरत असणारे थोर समाजसुधारक होते, त्यांनी ” मन चंगा, तो कटौती मे गंगा ” यासारख्या असंख्य दोह्यातून सहस सुंदर आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी तसेच समाजात एकीची भावना वृध्दिंगत होण्यासाठी केलेले प्रयत्न व्यापक आहेत.सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवनभर समताधिष्टीत प्रयत्न केले, त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे तसेच तो भावी पिढीपर्यंत पोहोचविला पाहिजे असे प्रतिपादन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सुनिल कदम, नंदकुमार कांबळे, डाॅ.धनंजय भिसे,गणपत भाग्यवंत,दत्तात्रय कांबळे,मारुती वाघमारे, हरीश वाघमारे, जालिंदर थोरात, प्रभाकर कदम, चंद्रकांत म्हस्के, रामेश्वर पाचारे, बळीराम वाघमारे, दत्तात्रय सोनवणे,अशोक शेळके, मारुती सोनवणे, सूरज पाखरे, राजहंस पाचंगे, किरण सोनवणे, भगवान वाघमारे, ऍड. सूरज खाडे, संतोष वाघमारे, गोरोबा गुजर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते तसेच महापालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

संत रविदास महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. त्यांनी भारतातील महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान येथे जाऊन समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले. त्यांच्या “मन चंगा तो कटौती में गंगा” यांसारख्या अनेक रचना प्रसिद्ध आहे

त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments