Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनसामान्न्यांचा एक संवेदनशील अभ्यासू नेता हरवला!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार...

जनसामान्न्यांचा एक संवेदनशील अभ्यासू नेता हरवला!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या शोकसभेत मान्यवरांच्या संवेदना!* *अजितदादा अमर रहे च्या घोषणांसह श्रध्दांजली*

 

 

*अकोला* – अजितदादा म्हणजे जनसामान्न्यांच्या समस्या सोडविणारे आधारवड,शब्दाला जागणारे,वचनांना कृतीत उतरविणारे एक करारी,अभ्यासू व सेवाभावी व्यक्तिमत्व,एक कठोर प्रशासक परंतू प्रत्येकावर प्रेम करीत राहिलेले भावनाशील व्यक्तिमत्व अशा भावविभोर शब्दांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या वतीने त्यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अजितदादा अमर रहे…अमर रहे च्या घोषणांसह त्यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 

अजितदादांच्या अकस्मात झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून या घड्याळाच्या काट्याप्रमाणे जनसेवेसाठी धावणाऱ्या या माणुसकी जपणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला विसरणे कठीण आहे.अशा भावस्पर्शी प्रतिक्रिया त्यांच्या काम करण्याच्या पध्दती आणि स्वभाववैशिष्ट्यांच्या उदाहरणासह मान्यवरांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक जठापेठेतील जैन रेस्ट्रो येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष- संजय एम.देशमुख,शिवसेना नेते प्रा.प्रकाश डवले, साहित्यिक सौ.ममताताई इंगोले,ज्येष्ठ पत्रकार प्रदिप खाडे,कादंबरीकार पुष्पराज गावंडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.पत्रकार विनायक पांडे यांनी सामुहिक श्रध्दांजलीचे तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.महादेव लूले यांनी केले.”अरे रडता काय वेड्यांनो कामाला लागा” या स्व दादांच्या संदेशाप्रमाणे फुले,शाहू,आंबेडकरी विचारांना आत्मसात करून दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या सुनेत्राताईंचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला अंबादास तल्हार,पंजाबराव वर,श्रीकृष्ण माळी,मनोहर मोहोड,प्रा.मोहन काळे,रविन्द्र देशमुख,बुढन गाडेकर,एजाज खान,नरेन्द्र देशमुख,सुरेश महल्ले,सौ.दिपाली बाहेकर,दिलीप नवले, दिपक शिरसाट, अजय वानखडे,अमित इंगळे,डॉ.अशोक शिरसाट,राजाभाऊ देशमुख,राजेन्द्र इंगळे, के.एम‌.देशमुख,भास्कर इंगोले,रामकुमार अमानकर,सुधीर साकरकर, व अनेक पत्रकार उपस्थित होते.

=================================

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments