पुणे,2 फेब्रुवारी 2026 : पालवीया फाऊंडेशन व भाग्यशाली भविष्य शिक्षण फाऊंडेशन यांच्या सहकार्याने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एडब्ल्यूआरटी या कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा महोत्सव पुण्यातील गेणू भाऊ खेसे प्राथमिक विद्यालय,बर्मा शेल वस्ती,509 चौक, एअरपोर्ट रोड येथे पार पडला. या महोत्सवाला बालग्राम एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज, आर्टेंट एज्युकेशन फाऊंडेशन,रसाथी स्कुल ऑफ डान्स, स्लॅम आऊट लाऊड,बैठक फाऊंडेशन,स्कुल ऑफ फाइन आर्टस् ॲन्ड अप्लाईड आर्टस -एमआयटी एडीटी या भागीदारांचा सहयोग लाभला.
या महोत्सवाचे उद्घाटन नगरसेविका ऐश्वर्या पठारे, नवज्योती इंडिया फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष साईना भरूचा व अमुक-तमुकचे सहसंस्थापक ओमकार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
एडब्ल्यूआरटी हा वंचित मुलांसाठी एक वस्तीमध्ये आयोजित केलेला एक कला महोत्सव असून या फेस्टीव्हलमध्ये कलेच्या माध्यमातून विकासाचा सर्वसमावेशक उत्सव साजरा करण्यासाठी लहान मुले,कलाकार आणि समुदाय एकत्र आले होते.
यंदाच्या महोत्सवात बर्मा शेल वस्तीबरोबरच बालग्राम एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज,पर्णकुटी तसेच इतर वंचित समुदायातील मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अनाथाश्रमातील मुलांचाही समावेश आहे.या महोत्सवात बालपणातील विविध अनुभव एकाच मंचावर सामुहिक व कलात्मक पध्दतीने अनुभवता आले.
या दोन दिवसीय महोत्सवात बर्मा शेल बस्ती आणि इतर आसपासच्या परिसरातील कलाकारांचे सादरीकरण तसेच मुलांचे नृत्य,सामुहिक गीत सादरीकरण,कथानाट्य, सर्जनशील विचार व कलात्मक अभिव्यक्ती,मास्क मेकिंग आणि मेमरी पपेट यांच्या कार्यशाळा,सितार वादन,भरतनाट्यम व मोहिनी अट्टम,रॅप सादरीकरण आणि लाईव्ह बँड परफॉर्मंन्स अशा विविध कलाकृतींचे प्रदर्शन पाहण्याचा अनुभव घेता आला.
बर्मा शेल वस्ती येथील नर्सिंग विद्यार्थिनी सानिया शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या दोन दिवसीय महोत्सवात वंचित समुदायातील मुलांनी तयार केलेली चित्रे आणि कलाकृती प्रदर्शित क
रण्यात आल्या.


