Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरची जानेवारी 2026 मध्ये 33,880 युनिट्सची विक्री

टोयोटा किर्लोस्कर मोटरची जानेवारी 2026 मध्ये 33,880 युनिट्सची विक्री

पुणे, 2 फेब्रुवारी 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज जानेवारी 2026 महिन्यातील विक्री कामगिरी जाहीर केली. कंपनीने या कालावधीत एकूण 33,880 युनिट्सची विक्री नोंदवली असून, जानेवारी 2025 मध्ये ही विक्री 29,371 युनिट्स इतकी होती. यामध्ये देशांतर्गत बाजारात विक्री झालेल्या 30,630 युनिट्सचा आणि निर्यात झालेल्या 3,250 युनिट्सचा समावेश आहे. ही कामगिरी प्रमुख मॉडेल्सवरील ग्राहकांच्या सातत्यपूर्ण मागणीचे तसेच विश्वासार्ह आणि मूल्याधारित मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याच्या TKM च्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

विक्री कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कार्यकारी उपाध्यक्ष – सेल्स, सर्व्हिस आणि युज्ड कार बिझनेस, श्री. सबरी मनोहर यांनी सांगितले,

“2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक आणि उत्साहवर्धक झाली असून, आमच्या उत्पादन पोर्टफोलिओला मिळणारी सातत्यपूर्ण गती आणि गुणवत्ता, सुरक्षितता व शाश्वततेबाबतच्या आमच्या वचनबद्धतेवरील ग्राहकांचा विश्वास यामागे आहे. जानेवारी महिन्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर इबेला (URBAN CRUISER EBELLA) चे लाँच, ज्यामुळे भविष्यासाठी सज्ज मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यावर आमचा भर अधिक मजबूत झाला आहे. हे लाँच आमच्या मूल्य प्रस्तावाला अधिक बळ देणारे असून, भारताच्या कार्बन न्यूट्रॅलिटी तसेच हरित व शाश्वत मोबिलिटीच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला आमच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे द्योतक आहे.”

————————–

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेडची जानेवारी 2026 मध्ये 71,066 युनिट्सची विक्री

पुणे, 2 फेब्रुवारी 2026: जानेवारी 2026 मध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स लिमिटेडने एकूण 71,066 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, तर जानेवारी 2025 मध्ये ही विक्री 48,316 युनिट्स इतकी होती. या विक्री आकडेवारीमध्ये कंपनीची उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड यांच्या विक्रीचाही समावेश आहे.


——

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments