Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*बौद्ध समाजातील संस्थांसाठी १० लाख रुपये अनुदान योजना* *प्रस्ताव सादर करण्याचे...

*बौद्ध समाजातील संस्थांसाठी १० लाख रुपये अनुदान योजना* *प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध विश्वस्त, सदस्य असलेल्या बौद्ध समाजातील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांसाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० लाख रुपये अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.

 

ही योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अंमलात आणण्यात येणार असून, पात्र व इच्छुक संस्थांनी शासनाच्या नमुन्यातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्राप्त प्रस्तावांची छाननी करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ते शासनाकडे दिनांक ०६ मार्च २०२६ पर्यंत सादर करण्यात येणार आहेत.

 

तरी पात्र संस्थांनी दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यांक अधिकारी यांनी केले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments