Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिपेट छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु*

सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु*

 

 

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी व प्रौद्योगिकी संस्था (सिपेट), छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. सिपेट ही रसायन व खत मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय स्वायत्त संस्था असून महाराष्ट्रातील प्लास्टिक उद्योगांसाठी तांत्रिक सहाय्य, कुशल मनुष्यबळ निर्मिती व संशोधन कार्य करते.

 

सिपेटमध्ये प्रवेशासाठी दरवर्षी ऑल इंडिया कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT) घेण्यात येते. यंदा ही प्रवेश परीक्षा ७ जून २०२६ रोजी होणार असून प्रवेश अर्ज २८ मे २०२६ पर्यंत सादर करता येतील. दहावी, बारावी तसेच बी.एस्सी (अंतिम वर्ष) परीक्षा देत असलेले विद्यार्थी निकालाची वाट न पाहता अर्ज करू शकतात.

 

सिपेट छत्रपती संभाजीनगर येथे डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी (DPT), डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी (DPMT), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग (PGD-PPT) तसेच पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन (PD-PMD) हे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

या अभ्यासक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेवश घेण्याचे आवाहन सिपेटचे प्रशिक्षण प्रमुख आर. जीवन राम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९३७३६८७९१५ किंवा ०२४०-२४७८३२२ वर संपर्क साधावा.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments