पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय तंत्रनिकेतन, पुणे या संस्थेचा २६ वा पदविका प्रदान समारंभ गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या प्रांगणात सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास जेनकोव्होल समूह, मुंबईचे चेअरमेन डॉ. दीपक घैसास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात स्थापत्य, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान तसेच ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या शाखांतील स्नातकांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मानचिन्हे व पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र का. पाटील यांनी कळविले आहे.
0000


