Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशभक्त केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी (दि.१३) श्री शिवाजी मराठा...

देशभक्त केशवराव जेधे करंडक वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी (दि.१३) श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन : राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी रोजी शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा होईल. अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील यांनी दिली.

 

यावेळी डॉ. अमित गोगावले उपस्थित होते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.

 

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ११,१११, द्वितीय क्रमांकाला ७,७७७, तृतीय क्रमांकाला ५,५५५ आणि उत्तेजनार्थ ५ क्रमांकाना प्रत्येकी १,१११ रोख तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

सत्ता नव्हे, सेवा केशवराव जेधे यांची राजकीय भूमिका, डिजिटल युगात माणुसकी हरवते आहे?, जेन झी किती भान किती बेभान?, संस्काराची शाळा बंद होत आहे का, प्रदूषण, पर्यावरण आणि आपण, युवा पिढी आणि बदलत्या नातेसंबंधांचे वास्तव हे स्पर्धेचे विषय आहेत.

 

मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी डॉ.अमित गोगावले ९९२२०७४८४७, प्रा.डाॅ. विशाल गायकवाड ९८६०४०२३६५, प्रा. डॉ. सोनाली गोगवले ८९९९६३३८७६ , प्रा. शीतल वाघमारे ९६०४१६७५७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

 

अधिक माहितीसाठी- डॉ.अमित गोगावले ९९२२०७४८४७

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments