Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसक्षम उपक्रमाच्या माध्यमातून इंधन संवर्धन व शाश्वत ऊर्जा पद्धतीबाबत जागृती

सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून इंधन संवर्धन व शाश्वत ऊर्जा पद्धतीबाबत जागृती

पुणे,11 फेब्रुवारी 2026 : सक्षम 2026 या विशेष उपक्रम अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(एचपीसीएल) तर्फे इंधन संवर्धन आणि पेट्रोलियम उत्पादनांचा योग्य वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय याअंतर्गत विविध तेल कंपन्यांच्या सहयोगाने आयोजित उपक्रमाचा हा एक भाग आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत एचपीसीएलच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रसाद सावजी आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) चे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारूवाला यांनी दिली.

 

काँझर्व ऑईल अँड गँस, गो ग्रीन या टॅग लाइनसह हा उपक्रम १ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित केला गेला आहे.

 

सक्षम अंतर्गत एचपीसीएल तर्फे विविध जागरूकता कार्यक्रम,शिबिरे, चालक प्रशिक्षण कार्यक्रम,विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा, ग्राफिटी, निबंध स्पर्धा, ग्राहकांशी संवाद असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. इंधन संवर्धन ही फक्त आर्थिक बाब नसून पर्यावरणीय जबाबदारी देखील आहे.त्यादृष्टीने उर्जा सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचे योगदान असावे यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरे

ल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments