Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद* 

*पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद* 

 

 

पुणे, दि. ११: पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे ४ वा. ते सायंकाळी 6 वा. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव यांनी दिली आहे.

 

पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते पुरंदर हॉल बाणेर रोड वरील मुख्य प्रवेशद्वार तसेच पाषाण रोडवरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रोड वरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार या दरम्यान वाहतुकीस बंद राहणार आहे. नागरिकांनी पुणे विद्यापीठ चौक मार्गे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments