पुणे (प्रतिनिधी)
भोर येथील निवासी मूक बधिर विद्यालय व पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय यांचे “संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन ” दिनांक १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध गुणदर्शन समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमात निवासी मूकबधिर विद्यालय,आणि भो. ए. सो. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन २४ कार्यक्रम सादर केले .
शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ” संपन्न झाला .
सकाळी ११-३० ते १-०० या वेळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले.त्यानंतर दुपारी ३-३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून पुण्यातील औद्योगिक औषधीशास्त्र सल्लागार मोहन मोने,उद्योजक व गुंतवणूक सल्लागार मंदार ओक,राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू प्रकाश देशपांडे हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दत्तात्रय मोरे (सदस्य -ग.कौ.भो.ए.सो.)हे होते.
प्रमोद गुजर( चेअरमन- ग. कौ.भो.ए.सो.)डॉ.सुरेश गोरेगांवकर( मा.सचिव भो.ए.सो.)
मधुकर पैठणकर (उपाध्यक्ष – भो.ए.सो.)महादेव मळेकर(उपाध्यक्ष- भो.ए.सो.)
डॉ.आण्णासाहेब बिराजदार (चेअरमन -स्कूल कमिटी निवासी मूकबधिर विद्यालय आणि भो.ए.सो.पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा,भोर) ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
विविध गुणदर्शन कार्यक्रमातील निवडक चार कार्यक्रम सादर करण्यात आले.मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “छावा” पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी “टप टप पडती “…, प्राथमिक शाळेतील इयत्ता ३री च्या २४ विद्यार्थिनींनी ” “अष्टविनायक गणपतीचे गाणे” हा सुंदर नृत्याविष्कार सादर केले. इयत्ता२ री,३री ४ थी च्या ७६ विद्यार्थ्यांनी २०२५ मध्ये आपल्या देशात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी -“महाकुंभमेळा,श्रीराम मंदिरावरील ध्वज प्रतिष्ठापना, जागतिक वारसा मिळालेले महाराष्ट्रातील किल्ले,महिला वर्ल्ड कप,आणि सिंदूर ऑपरेशन” असा एकत्रित कलाविष्कार -भारत २०२५ सादर केला.सुरवातीस प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
भो.ए.सो.पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका विनया कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.मूकबधिर विद्यार्थी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांचे हे वैशिष्टयपूर्ण असे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन,वर्षभरात शाळेत घेतले जाणारे शालेय,सहशालेय व शाळाबाह्य उपक्रम,विविध स्पर्धा परीक्षा याची तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत माहिती दिली.
भो.ए.सो.प्राथमिक शाळेच्या कार्याध्यक्षा ज्योती वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना शाल,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे मोहन मोने यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी शाळांचे महत्त्व विशद केले.मंदार ओक यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांचा विकास करावा असे आवाहन केले.प्रकाश देशपांडे सर यांनी मुलांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
मंदार ओक यांनी शाळेसाठी रुपये पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली.
प्रमुख पाहुणे व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.निवासी मूकबधिर विद्यालय,चे कार्याध्यक्ष महादेव दबडे यांनी आभार मानले.
अशाप्रकारे शरद जाधव (प्र.मुख्या. निवासी मूकबधिर विद्यालय ,भोर) विनया कुलकर्णी (प्र.मुख्या.भो.ए. सो. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा ,भोर) यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय नियोजनबद्ध रीतीने व उत्साहात पार पडले.


