Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचा परिवर्तनकारी सत्संग पुण्यात* श्री गणेश कला क्रीडामंच...

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचा परिवर्तनकारी सत्संग पुण्यात* श्री गणेश कला क्रीडामंच स्वारगेट, पुणे येथे आयोजन

 

 

पुणे : श्रीमद् राजचंद्रजी यांचे परम भक्त, आत्मज्ञानी गुरु, आध्यात्मिक मार्गदर्शक, मानवतेचे अधिनायक आणि श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या सत्संगाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. दि. २० व २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १० यावेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे सत्संग होणार आहे.

 

ज्यांच्या कल्याणकारी वाणीमुळे जगभरातील लाखो लोक आपल्या जीवनात आंतरिक परिवर्तनाचा अनुभव घेत आहेत, अशा पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या अमूल्य मार्गदर्शन पुणेकरांना या कालावधीत मिळणार आहे.

 

युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी जगभरातील ९६ युवक केंद्रांमधून सत्संग, साधना, सेवा, संस्कृती आणि क्रीडा या पाच ‘एस’ उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना उच्च ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे आपल्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर सत्संगाचा सकारात्मक प्रभाव अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने साधक सहभागी होणार आहेत.

 

भगवान महावीरस्वामी यांच्या सनातन मार्गाचे प्रवर्तक आणि उद्धारक, आत्मज्ञानी संत, मूर्तिमंत अध्यात्म आणि तीव्र प्रज्ञावंत श्रीमद् राजचंद्रजी यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी आत्मप्राप्तीचा मार्ग प्रसृत केला होता. त्यांचे बोधवचन प्रत्येकाच्या मनात खोलवर रूजत आहे. अशा आंतरिक परिवर्तनाासाठी कार्यरत असलेली आध्यात्मिक अभियान संस्था श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर आज जगभरात आपल्या २०६ केंद्रांच्या माध्यमातून कार्यरत आहे.

 

पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या अपार दयाभावाचे साकार रूप म्हणजे ‘श्रीमद् राजचंद्र लव्ह अॅन्ड केअर’, जी निःस्वार्थ सेवेद्वारे वंचित व गरजू लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी कार्यरत आहे. तसेच ‘श्रीमद् राजचंद्र डिव्हाइन टच’ जगभर पसरलेल्या २५२ केंद्रांच्या माध्यमातून बालमनात मूल्यांचे बीजारोपण करत आहे.

 

ज्याला भक्तीची ओढ आहे तो मनात अहंकार न ठेवता स्वतः भक्तिमार्गावरून चालत जातो. त्याचप्रमाणे पूज्य गुरुदेवश्री राकेशजी जगभरातील जिज्ञासू जीवांना धर्मयात्रांच्या माध्यमातून दर्शन, ज्ञान व अनुभूतीचा अद्वितीय लाभ देतात. धर्मयात्रेदरम्यान ते साधकांना सत्संग, साधना, प्रतिष्ठा, पदार्पण इत्यादी माध्यमांतून मार्गदर्शन करून अधिक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवितात. त्यामुळे पुणेकरांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments