Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सुरक्षितता, अनुपालन आणि शाश्वत पद्धती मजबूत करण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रमाची...

पुण्यात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सुरक्षितता, अनुपालन आणि शाश्वत पद्धती मजबूत करण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रमाची घोषणा

 

एलनप्रोचा ज्ञान-केंद्रित उद्योग उपक्रम; फूड सेफ्टी आणि ऑपरेशनल मानकांवर विशेष भर

 

पुणे, १७ फेब्रुवारी २०२६: पुण्यातील फूड सर्व्हिस आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र विविध नव्या फॉरमॅट्समुळे झपाट्याने विस्तारत आहे. या वाढीसोबतच सुरक्षित कार्यपद्धती, नियमांचे पालन आणि शाश्वत पायाभूत सुविधा यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कमर्शियल रेफ्रिजरेशन सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एलनप्रोने आज पुणे आवृत्तीतील ‘सक्षम’ या ज्ञान-आधारित उद्योग उपक्रमाची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत या उपक्रमाचे उद्दिष्ट, उद्योगासाठीचे महत्त्व आणि अपेक्षित परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी एलनप्रोचे संचालक श्री. संजय जैन, हॉस्पिटॅलिटी कन्सल्टंट्स फोरम (HCF) चे अध्यक्ष श्री. पी. श्रवण कुमार तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

तज्ञांच्या मते, फूड व्यवसाय वेगाने वाढत असला तरी तापमान नियंत्रण, रेफ्रिजरेशन देखभाल आणि ऑडिट तयारी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये अजूनही सातत्याचा अभाव दिसून येतो. यामुळे अन्नसुरक्षेचे धोके, अनावश्यक नुकसान आणि खर्चाचा ताण वाढू शकतो.

सक्षम पुणे अंतर्गत शेफ, हॉटेल इंजिनिअर्स, फूड बिझनेस ऑपरेटर्स, फॅसिलिटी मॅनेजर्स आणि अनुपालन तज्ञांसाठी तज्ज्ञ-मार्गदर्शित सत्रे आणि उद्योग संवाद आयोजित केले जाणार आहेत. हे सत्रे प्रत्यक्ष कामकाजातील अडचणी आणि उपायांवर आधारित असतील.

एकदिवसीय कार्यक्रमात तीन प्रमुख विषयांवर भर असेल — फूड सेफ्टी आणि स्वच्छता, अनुपालन तयारी, आणि शाश्वत हॉस्पिटॅलिटी संचालन. तापमान व्यवस्थापन, अन्नाच्या गुणवत्तेत रेफ्रिजरेशनची भूमिका, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, किचन रिस्क कंट्रोल, ग्रीस आणि वेस्टवॉटर व्यवस्थापन, तसेच नियमांचे पालन न केल्यास होणारे आर्थिक परिणाम यांसारखे विषय सत्रांमध्ये घेतले जातील. पॅनेल चर्चांमधून उपकरणांची निवड आणि SOP चा सुरक्षिततेवर होणारा थेट परिणामही स्पष्ट केला जाईल.

एलनप्रोचे संचालक श्री. संजय जैन म्हणाले,

“आज फूड व्यवसाय मोठ्या प्रमाणात आणि वेगाने चालतो आहे. सुरक्षित आणि टिकाऊ वाढीसाठी मजबूत कार्यप्रणाली आणि योग्य तांत्रिक निर्णय अत्यावश्यक आहेत. सक्षमचा उद्देश म्हणजे मानके प्रत्यक्ष कामात कशी उतरवायची याचे व्यवहार्य मार्गदर्शन देणे.”

HCF चे अध्यक्ष श्री. पी. श्रवण कुमार म्हणाले,

“उद्योग वाढत असताना फूड सेफ्टी आणि अनुपालनाची मूलभूत समज अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. सक्षमसारखे ज्ञान मंच उद्योगातील व्यावसायिक मानके उंचावण्यास मदत करतात.”

सक्षम हा एक सातत्याने राबवला जाणारा बहु-शहर उद्योग उपक्रम असून, प्रत्येक शहरातील गरजांनुसार त्याच्या आवृत्त्या आयोजित केल्या जाणार आहेत.

 

सुरक्षित आणि कार्यक्षम फूड ऑपरेशन्समध्ये रेफ्रिजरेशन प्रणालींची वाढती भूमिका

पत्रकार परिषदेत एलनप्रोने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन, फूड रिटेल आणि क्विक कॉमर्स डार्क स्टोअर्समध्ये अन्नसुरक्षा, ऑडिट अनुपालन आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कमर्शियल रेफ्रिजरेशन प्रणाली किती महत्त्वाची ठरत आहे, यावर भर दिला.

कंपनीकडून कमर्शियल रेफ्रिजरेशन सिस्टिम्स, कोल्ड रूम्स आणि वापरानुसार डिझाइन केलेली कूलिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून दिली जातात. सुरक्षित साठवण, लास्ट-माइल फूड डिलिव्हरी आणि उच्च लोड किचन ऑपरेशन्ससाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते. ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक कूलिंग पर्यायांनाही कंपनी प्रोत्साहन देत आहे.

 

‘कूल स्किल्स ब्राइट फ्यूचर’द्वारे तांत्रिक कौशल्य विकासाला चालना

एलनप्रोने आपल्या कूल स्किल्स ब्राइट फ्यूचर या कौशल्य विकास उपक्रमाची प्रगतीही यावेळी मांडली. या कार्यक्रमांतर्गत नवोदित तंत्रज्ञांना कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि सुरक्षित कूलिंग पद्धतींबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत २०० हून अधिक तरुणांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

या प्रशिक्षणातून उद्योगासाठी तयार तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे आणि रोजगाराशी जोडलेली कौशल्ये विकसित करणे हा उद्देश आहे. तंत्रज्ञान विकासाबरोबरच कौशल्य विकास आणि ज्ञान मंच उभारणीवर कंपनीचा भर पुढेही कायम राहणार असल्याचे एलनप्रोने स्पष्ट केले.

एलनप्रो बद्दल

एलनप्रो ही कमर्शियल रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून आधुनिक आणि प्रगत कूलिंग तंत्रज्ञान उद्योगात आणण्यावर तिचा भर आहे. 2009 मध्ये स्थापना झाल्यापासून कंपनी HoReCa, अल्कोहोलिक बेव्हरेज, फूड आणि बेव्हरेज रिटेल, फार्मास्युटिकल्स आणि हेल्थकेअर अशा विविध क्षेत्रांतील रेफ्रिजरेशनमधील उणिवा भरून काढण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

गुरुग्राम येथे मुख्यालय असलेल्या एलनप्रोकडे भारतातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुमारे 700 चॅनल पार्टनर्सचे मजबूत जाळे आहे. भारतातील कठीण हवामान लक्षात घेऊन तयार केलेली विविध प्रकारची उत्पादने कंपनीने बाजारात आणली आहेत. गुणवत्ता, सातत्यपूर्ण कामगिरी आणि टिकाऊपणा यासाठी या उत्पादनांना उद्योगात विशेष मान्यता मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments