Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedइन्श्युरन्सदेखोकडून ‘शी विल राइज अगेन’ कार्यक्रमाचा शुभारंभ;

इन्श्युरन्सदेखोकडून ‘शी विल राइज अगेन’ कार्यक्रमाचा शुभारंभ;

6 मार्च 2024: गुरुग्राम येथे मुख्यालय असलेला भारताचा अग्रगण्य इन्श्युअरटेक ब्रॅण्ड इन्श्युरन्सदेखोने अलीकडेच एसडब्ल्यूआरए – शी विल राइज अगेन या करिअर ब्रेकवर असलेल्या महिलांना पुन्हा कामावर रुजू होण्यावर लक्ष केंद्रित करणारा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी कंपनीने, “दी मॅग्निफिसन्‍ट मेरी कोम” यांना आमंत्रित केले. आपल्या करिअरमधून किमान वर्षभराचा अंतर घेतलेल्या महिलांना कामावर परतण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. या महिलांना समान संधी, हक्क आणि मोबदला देण्याप्रती हा कार्यक्रम समर्पित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी त्यांना न्याय्य वागणूक दिली जावी, त्यांच्या कामाची दखल घेतली जावी याची दक्षता घेतली जाणार आहे. मेरी कोम यांनी आपल्या बॉक्सिंग क्षेत्रातील वाटचालीमध्ये एक करिअर ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर आपल्या क्षेत्रात परतल्यावर त्यांनी जिंकलेली ऑलिम्पिक पदके आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्स म्हणजे कमबॅक कसा असावा याचे आदर्श उदाहरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments