Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यसनाचा अफजल विचारांच्या वाराने पराभूत व्हावा* सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्यरथ सोहळ्यात...

व्यसनाचा अफजल विचारांच्या वाराने पराभूत व्हावा* सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्यरथ सोहळ्यात अनोखा संदेश ; शिवजयंती भव्य मिरवणूक सोहळा 

 

 

पुणे : व्यसनरूपी राक्षसावर शिवविचारांचा प्रहार करूया… सुसंकृत स्वराज्यासाठी व्यसनमुक्त समाज घडवूया… व्यसनाचा अफजल पराभूत होईल विचारांच्या वाराने, उज्वल भविष्य घडेल शिवशक्तीच्या आधाराने… असे फलक यंदा सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्यरथ सोहळ्यात झळकले. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य घडविताना व्यसनाधीनतेच्या राक्षसाला शिवविचारांनी फाडण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

 

सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्य रथ समिती, पुणे तर्फे फरासखाना समोर रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त कृष्णकांत पिंगळे, बेळगावचे महापौर मंगेश पवार, डॉ. मिलिंद भोई, नगरसेविका स्वप्नाली पंडित यांसह सरदार पवार घराणे, सरदार पायगुडे घराण्यातील सदस्य उपस्थित होते.

 

समितीचे जयाजी मोहिते, ऍड. सुभाष मोहिते, शिरीष मोहिते, दत्ता मोहिते, संदीप मोहिते, प्रशांत मोहिते, विक्रांत मोहिते, रोहन मोहिते, सागर मोहिते, प्रकाश मोहिते, दिनेश मोहिते, रामेश्वर मोहिते आदींनी संयोजन केले. शिवरायांच्या स्वराज्याला व्यसनमुक्त सुसंस्कृत करूया, असा निर्धार उपस्थितांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments