Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात केल्यास यश निश्चित – अविनाश भारती

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात केल्यास यश निश्चित – अविनाश भारती

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६:- ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी विचार आत्मसात केला, तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकते,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांनी केले. शिवचरित्रातील प्रसंगांच्या माध्यमातून आजच्या समाजजीवनात शिवरायांचे विचार किती उपयुक्त आहेत, याचे सखोल विश्लेषण देखील त्यांनी केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये चिंचवड येथील संभाजीनगर येथे ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, या कार्यक्रमात अविनाश भारती हे बोलत होते.

 

या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम,नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य कुशाग्र कदम,उपायुक्त अण्णा बोदडे, साई किरण मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल नारखेडे, उपाध्यक्ष अजित कोडलकर, गिरीश तेलंग, गौरव कदम, कार्याध्यक्ष संजय कलागते, खजिनदार निलेश नारखेडे, सहखजिनदार मंगेश गुंजाळ आदी उपस्थित होते. साई किरण मित्र मंडळाचे या कार्यक्रमाला सहकार्य ला

भले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments