Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorized'हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे*

‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे*

 

 

पुणे, दि.२०: #श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी #खारघर येथे आयोजित #हिंददीचादर’ कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांनी केले.

 

शीख समाजाचे

नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांनी ‘मानवता’ आणि ‘धार्मिक स्वातंत्र्य’ या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, तो इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो. “श्रद्धेसाठी स्वतःचे शीश अर्पण करणे” अशी घटना जागतिक इतिहासात विरळच आहे. त्यांच्या याच बलिदानामुळे त्यांना कृतज्ञतेने ‘हिंद दी चादर’ म्हटले जाते.

 

 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम २८ फेब्रुवारी २०२६ व ०१ मार्च २०२६ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली.

 

 

यावेळी ‘हिंद-दी-चादर’कार्यक्रम राज्यस्तरीय समन्वय समितीचे अशासकीय सदस्य तथा कॅम्प येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी, बंजारा समाजाच्या कविता दिलीप राठोड, रमेश चव्हाण,जीतएल चांदवाणी,असांजा तसेच शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव (वारकी) या नऊ समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.

 

बैठकीत कार्यक्रमास जाण्याकरिता बसेसची व्यवस्था करण्यात यावी, बसेस सोबत रुग्णवाहिका व प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करावी. पीएमपीएमएलच्या बसेसवर जनजागृती करण्याकरिता कार्यक्रमाचे जाहिरात फलक लावण्यात यावेत आदी सूचना करण्यात आल्या.

 

महापौर नागपुरे म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेकडून बैठकीत करण्यात आलेल्या केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने तात्काळ पूर्तता करण्यात येईल आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.

 

उप महापौर श्री.वाडेकर म्हणाले, ‘हिंद कि चादर ‘ या परिवारात सर्व माझे मित्र असून त्यांना सदर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरिता योग्य ते सहकार्य करण्यात येईल तसेच या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

या बैठकीकरिता

आरोग्यप्रमुख नीना बोराडे, मा. उपायुक्त (परिमंडळ क्र.१), माधव जगताप, उपायुक्त (परिमंडळ क्र.२) श्री संतोष वारुळे, उपायुक्त (परिमंडळ क्र.४), अरविंद माळी, मा. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री अविनाश सकपाळ, उपायुक्त (झोनिपू), संदीप खलाटे, मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मा. उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) तुषार बाबर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments