Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनादसप्तक संगीत विद्यालय प्रस्तुत – ‘सूर पहाडी’ राग पहाडीवरील १११ गीतांची विक्रमी...

नादसप्तक संगीत विद्यालय प्रस्तुत – ‘सूर पहाडी’ राग पहाडीवरील १११ गीतांची विक्रमी दीर्घ मैफल

पुणे, दि. २१ फेब्रुवारी २०२६ : पुण्यातील “नादसप्तक संगीत विद्यालय” यांच्या वतीने भारतीय लोकसंगीत व शास्त्रीय संगीत परंपरेतील अत्यंत मधुर, आणि लोकप्रिय राग पहाडीवर आधारित १११ हिंदी व मराठी गीतांची आगळीवेगळी मैफल ‘सूर पहाडी’ आयोजित करण्यात आली आहे.

 

ही भव्य संगीत मैफल बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ११.११ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे.

 

या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् (Asia Book of Records) तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् ( India Book of Records) मध्ये नोंद करण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर,यांचे आहे. पुण्यातील संगीत, कला व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.

 

या मैफलीत गिरीश पंचवाडकर यांच्यासह नादसप्तक संगीत विद्यालयातील २५ विद्यार्थी, पहाडी रागावर आधारित गाणी सादर करणार आहेत.

 

संगीत संयोजनात, प्रसिद्ध युवा तबलावादक व विद्यालयाचे संचालक अक्षय पंचवाडकर, ज्येष्ठ कीबोर्ड वादक रशीद शेख,तसेच नागेश भोसेकर, प्रसन्न बाम, सचिन वाघमारे, रोहित साने, आदित्य निरगुडे आदी पुण्यातील नामवंत वादकांचा सहभाग लाभणार आहे.

 

19 वर्षे ते 99 वर्षे वयातील कलाकारांच्या सहभागाने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात या कार्यक्रमात, राग पहाडीवर आधारित भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, लावणी, अभंग, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली व संत रामदास यांच्या अभंगांचा समावेश असेल. मराठी व हिंदी चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय पहाडी सरगम व तराणा (स्वररचना – गिरीश पंचवाडकर) हेही विशेष आकर्षण ठरणार आहेत.

 

युवा पिढीसाठी, या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकप्रिय इन्फ्लुएंसर व रील स्टार अथर्व सुदामे हे विशेष अतिथी कलाकार म्हणून सहभागी हॊणार असून, त्यांच्या सादरीकरणाची उत्सुकता रसिकांमध्ये आहे, असे संचालक अक्षय पंचवाडकर यांनी सांगितले.

 

‘सूर पहाडी’ ही मैफल पुणेकर रसिकांसाठी स्वरांची एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.

 

हा कार्यक्रम रसिकांना विनामूल्य असून, सर्वांनी या मैफलीचा आनंद घ्यावा असे आवाहन नादसप्तक तर्फे करण्यात आले आहे.

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष जोशी, नीरज फडके,रूपा इनामदार, दिपश्री डोळे, मयुरी देशपांडे, आदिती ताले, धवल ताले,गायत्री उंब्रजकर,भारत कोकीळ, रोहित परांजपे आदि परिश्रम घेत आहेत.

 

 

 

संचालक अक्षय पंचवाडकर – 9881611177 , गरीश

पंचवाडकर – 9850177111

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments