नागपूर, 7 मार्च, 2024: नागपुर डिस्ट्रिक्ट हार्ड कोर्ट टेनिस असोसिएशन(एनडीएचटीए) यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयटीएफ, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 35000डॉलर महा ऊर्जा आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या येवानवू कु हिने रशियाच्या अव्वल मानांकित इरिना मारिया बाराचा 6-4, 3-6, 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. भारताच्या सहजा यमलापल्ली हिने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
रामनगर येथील एमएसएलटीए टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पाचव्या मानांकित सहजा यमलापल्लीने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या सोनल पाटीलचा 6-2, 6-1 असा सहज पराभव केला. चुरशीच्या लढतीत सातव्या मानांकित इटलीच्या मिरियाना टोनाने रशियाच्या एनास्तेसिया झोलोटारेवाचा 6-4, 4-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. रशियाच्या एकतेरिना याशिना हिने क्वालिफायर भारताच्या सोहा सादिकला 6-4, 6-1 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित स्लोव्हाकियाच्या दलिला जाकुपोविकने जपानच्या अकिको ओमाईचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जपानच्या रिनॉन ओकुवाकीने मेई यामागुचीवर 6-3, 2-6, 6-4 असा विजय मिळवला.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी यांनी दुसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या फॅनी ऑस्टलंड व रशियाच्या एकतेरिना याशिना यांचा 6-2, 7-6(0) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उप-उपांत्यपूर्व फेरी:
येवानवू कु(कोरिया)वि.वि. इरिना मारिया बारा (रशिया)[1] 6-4, 3-6, 6-1;
सहजा यमलापल्ली(भारत)[5]वि.वि. सोनल पाटील (भारत)6-2, 6-1;
मिरियाना टोना(इटली)[7]वि.विएनास्तेसिया झोलोटारेवा(रशिया) 6-4, 4-6, 6-4;
रिनॉन ओकुवाकी(जपान)वि.वि.मेई यामागुची (जपान)6-3, 2-6, 6-4;
डेयॉन बॅक(कोरिया)वि.वि. अयुमी कोशिशी(जपान) 6-0, 6-1;
डारिया कुडाशोवा(रशिया)वि.वि. इकुमी यामाझाकी(जपान)7-6(5), 6-2;
एकतेरिना याशिना(रशिया)वि.वि.सोहा सादिक(भारत) 6-4, 6-1;
दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया)[2]वि.वि. अकिको ओमाई (जपान) 6-3, 6-2;
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
इरिना मारिया बारा(रशिया) / दलिला जाकुपोविक(स्लोव्हाकिया) [1]वि.वि.थासापोर्न नाकलो (थायलंड)/अकिको ओमाय(जपान) 6-1, 6-4, 10-4;
कु येनवू (कोरिया)[4] /जस्टिना मिकुलस्कीट(लिथुनिया)वि.वि. मिरियाना टोना(इटली)/ सहजा यमलापल्ली(भारत) 6-3, 6-1;
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती ( भारत) /वैदेही चौधरी (भारत)वि.वि. फॅनी ऑस्टलंड(स्वित्झर्लंड)[2] /एकटतेरिना याशिना(रशिया) 6-2, 7-6(0);
यास्मिन मन्सुरी(फ्रांस)/डायना मार्सिचेविका(लात्विया)[3]वि.वि. डारिया कुदाशोवा /एनास्तासिया झोलोटारेवा 7-5, 6-1.


