Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिमालया बेबीकेअरने नवीन पॅकेजिंग डिझाइन सादर केले; पुढील पाच वर्षांत 500 टन...

हिमालया बेबीकेअरने नवीन पॅकेजिंग डिझाइन सादर केले; पुढील पाच वर्षांत 500 टन प्लास्टिक कमी करण्याचे उद्दिष्ट

 

मुंबई, 26 फेब्रुवारी 2026 : भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि पालकांची पसंती असलेल्या बेबी केअर ब्रँड हिमालया बेबीकेअरने आपल्या संपूर्ण जेंटल बेबी केअर उत्पादनांसाठी एक नवीन पॅकेजिंग डिझाइन सादर केले आहे. हा बदल कंपनीच्या पर्यावरणपूरक उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहे. नवीन पॅकेजिंग वापरण्यास अधिक सोयीस्कर, आकर्षक आणि विचारपूर्वक डिझाइन केलेले आहे. तसेच पर्यावरणाची काळजी लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे.

कंपनीच्या सस्टेनेबिलिटी आराखड्यानुसार, हिमालया बेबीकेअरच्या नव्या पॅकेजिंगमुळे पुढील पाच वर्षांत सुमारे 500 टन प्लास्टिकचा वापर टाळला जाईल, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 100 टन प्लास्टिकचा वापर कमी होईल असा अंदाज आहे. हा उपक्रम पालकांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलाचेही प्रतीक आहे. आज अनेक पालक दैनंदिन वापरातील वस्तू पर्यावरणासाठी किती सुरक्षित आहेत, याचा विचार करून खरेदीचा निर्णय घेतात. आपल्या मुलांचे सुरक्षित आणि चांगले भविष्य लक्षात घेऊन ते अधिक जबाबदारीने उत्पादने निवडत आहेत.

हिमालया बेबीकेअरच्या नव्या पॅकेजिंगच्या लाँचसाठी एक प्रभावी डिजिटल फिल्म सादर करण्यात आली आहे. या फिल्ममध्ये मुलांच्या भविष्यासंदर्भातील पालकांची असलेली सामायिक चिंता दाखवण्यात आली आहे. ही फिल्म पालकांच्या बैठकीवर आधारित आहे. त्या बैठकीत प्लास्टिक कचरा वाढत असल्याची समस्या आणि त्याचा भविष्यात होणारा परिणाम यावर विचार करायला लावणारी चर्चा दाखवली आहे. फिल्ममध्ये पालकांमधील प्रामाणिक आणि मनमोकळा संवादही दाखवला आहे. आज अनेक पालकांना वाटते की मुलांची काळजी घेणे म्हणजे फक्त त्यांची रोजची देखभाल नव्हे, तर त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणपूरक आणि योग्य निवडी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या फिल्मद्वारे हिमालया बेबीकेअर असा संदेश देते की, पॅकेजिंगमध्ये बदल करून प्लास्टिकचा वापर कमी करणे यांसारख्या जबाबदार कृतींमुळे आपण सर्वजण मिळून पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि टिकाऊ भविष्य घडवू शकतो.

या बदलामागील विचार व्यक्त करताना श्री. एन. व्ही. चक्रवर्ती, डायरेक्टर – बेबीकेअर, हिमालया वेलनेस कंपनी यांनी सांगितले, “हिमालया बेबीकेअरमध्ये आमची जबाबदारी फक्त आजच्या बाळांसाठी सौम्य आणि सुरक्षित उत्पादने तयार करण्यापुरती मर्यादित नाही. आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय या विश्वासावर आधारित असतो की, बाळांना निसर्गातील सर्वोत्तम पोषण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर निसर्गाची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मुलांना उद्या अधिक निरोगी आणि सुरक्षित जग मिळेल. बेबीकेअरच्या पॅकेजिंगमध्ये केलेला हा बदल प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा भाग आहे. यामुळे मुलांच्या भविष्यासाठी आमची बांधिलकी दिसून येते. आमची उत्पादने बाळांसाठी जशी सुरक्षित आहेत, तशीच ती पर्यावरणासाठीही चांगली असावीत, हा आमचा प्रयत्न आहे.”

नवीन पॅकेजिंग अधिक स्वच्छ आणि आधुनिक डिझाइनसह सादर करण्यात आले आहे. लेबलिंग अधिक स्पष्ट आणि सहज वाचता येईल असे तयार करण्यात आले आहे. पालकांचा विचार करून तयार केलेल्या या पॅकमध्ये चांगली पकड, स्थिरता आणि वापरण्यास अधिक सोयीस्कर रचना देण्यात आली आहे. गुणवत्ता आणि सुरक्षिततेत कोणतीही तडजोड न करता दैनंदिन वापर अधिक सोपा आणि त्रासमुक्त करण्यात आला आहे.

देशभरातील पालकांपर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी ही डिजिटल फिल्म हिंदी भाषेत तयार करण्यात आली आहे. तसेच पंजाबी, तमिळ, कन्नड, तेलुगू, बंगाली, ओडिया, आसामी, गुजराती आणि मराठी अशा दहा प्रादेशिक भाषांमध्येही सादर करण्यात आली आहे. यामुळे विविध राज्यांतील आणि समुदायांतील पालकांपर्यंत हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो.

या उपक्रमाद्वारे हिमालया बेबीकेअर पुन्हा सांगते की, बेबीकेअर ही फक्त बाळांच्या त्वचेची काळजी घेण्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या मुलांना भविष्यात मिळणारे सुरक्षित, टिकाऊ आणि निसर्गासोबत सुसंवाद साधलेले जग देण्याशी संबंधित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments