Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली 'पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण'...

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

 

 

वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार करा

 

-विभागीय आयुक्त

 

 

 

पुणे, दि. 26 : पुणे शहरातील वाहतूक योजनांचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची 19 वी आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे मनपा अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते.

 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियमन योग्यरितीने होण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचे सर्व्हेक्षण करावे. वाहतुकीचा प्रारंभ व दिशा यांचे सर्वेक्षणानुसार प्रकल्पांचे सादरीकरण करावे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

 

लोकहित लक्षात घेऊन वाहतूक प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करावेत. जास्त ट्रॅफिक होणाऱ्या भागांमध्ये मास्टर टनेल करावेत, असे श्री. म्हसे यांनी सांगितले. वाहनांसाठी पार्किंग पॉलिसी लक्षात घेऊन बोगद्यांची संख्या व दिशा निश्चित करावी, असे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तसेच नगररचना वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments