Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 26 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत असून आकर्षक तसेच पसंतीचे नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित शुल्क भरून अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

इच्छुक वाहनधारकांनी दि. 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असून अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 

दि. 4 मार्च 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता आकर्षक नोंदणी क्रमांकांचा लिलाव करण्यात येणार आहे. अर्जदारांनी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत अनामत रक्कम (डीडी) जमा करावी. अनामत रक्कम ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँकेद्वारे अदा करावी. जुने, रद्द किंवा अवैध डीडी स्वीकारले जाणार नाहीत. लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक देण्यात येईल.

 

एकाच पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पद्धतीने निर्णय घेण्यात येईल. लिलावात अनुपस्थित राहिल्यास अर्जदार अपात्र ठरेल.

 

दरम्यान, उर्वरित पसंती क्रमांकांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर नाव व आधार संलग्न मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून शुल्क भरता येणार आहे. यासाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

 

वाहनधारकांनी नियोजित वेळेत अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे

.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments