Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedवॅस्कॉन इंजिनिअर्सचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सोबत बांधकाम आणि रिअल इस्टेट नाविन्यपूर्णता...

वॅस्कॉन इंजिनिअर्सचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सोबत बांधकाम आणि रिअल इस्टेट नाविन्यपूर्णता याकरता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी सहयोग

पुणे, 27 फेब्रुवारी 2026: जवळपास चार दशकांचा वारसा असलेल्या अग्रगण्य EPC आणि रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक वॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड (VASCONEQ) ने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे उत्कृष्टता केंद्राची उभारणी केली आहे. ही सुविधा सीओईपी कॅम्पसमधील निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये विकसित करण्यात आली असून एकूण बांधकाम क्षेत्र 18,000 चौ.फूट आहे.

 

 

 

उत्कृष्टता केंद्राची निर्मिती बांधकाम, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांशी संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधन, चाचणी आणि अंमलबजावणीस पाठबळ देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून करण्यात आली आहे. या सुविधा केंद्राचा काही भाग CREDAI सोबत विकसित करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या भागात इंडियन प्लंबिंग असोसिएशन (IPA) यांच्या सहकार्याने अत्याधुनिक प्लंबिंग लॅब उभारण्यात येणार आहे.

 

 

 

हे केंद्र लाईव्ह तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, पथदर्शी प्रकल्प, शैक्षणिक–औद्योगिक कार्यशाळा, संशोधन सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांना सक्षम करेल. यामुळे विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना आणि संशोधकांना प्रत्यक्ष क्षेत्रातील उपयोजन आणि सध्याच्या औद्योगिक पद्धतींचा अनुभव मिळेल. त्यायोगे शैक्षणिक संशोधन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील दुवा अधिक बळकट होईल. हे व्यासपीठ विकसक, वास्तुविशारद, EPC कंपन्या, अभियंते, सल्लागार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, नगररचनाकार आणि सरकारी भागधारक यांना एकत्र आणेल.

 

 

 

हे केंद्र शाश्वत आणि कारखान्यात पूर्वनिर्मिती करून साइटवर बसवले जाणारे बांधकाम साहित्य, प्रगत बांधकाम तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि मॉड्युलर प्रणाली, स्मार्ट पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि जल व्यवस्थापन उपाययोजना, BIM आणि डिजिटल साइट साधने, स्वयंचलन, विश्लेषण आणि हरित इमारत पद्धती अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल.

 

 

 

या प्रसंगी बोलताना वॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष एमेरिटस श्री. आर. वासुदेवन म्हणाले, “सीओईपी येथील उत्कृष्टता केंद्र हे आमच्या संस्थेशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांचे आणि उद्योग व शैक्षणिक क्षेत्रामधील मजबूत दुवे निर्माण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाचे प्रतीक आहे. प्रकल्प अंमलबजावणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहोत. बांधकाम पद्धतींमध्ये तंत्रज्ञान आणि डेटाचा वाढता वापर होत असताना हे केंद्र शिक्षण, चाचणी आणि वापर- उपयोजन यासाठी एक सामायिक व्यासपीठ म्हणून कार्य करेल.”

 

 

 

हा उद्घाटन सोहळा आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ येथून श्री. आर. वासुदेवन यांच्या पदवीधर तुकडीचा 50 वा वर्धापन दिन या गोष्टी देखील एकाच वेळी जुळून आल्या आहेत. माजी विद्यार्थ्यांच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद त्यायोगे होत असून संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments