Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedउज्जैन येथील महाकालेश्वराची ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पूजा श्री बहिरोबा देव...

उज्जैन येथील महाकालेश्वराची ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात पूजा श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; श्री महाकालेश्वराचा मुखवटा व फुलांची आकर्षक आरास

पुणे : भारतातील बारा ज्योतिलिंर्गांपैकी तिस-या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या उज्जैन येथील महाकालेश्वराची पूजा पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात करण्यात आली. त्यासोबतच मोगरा, झेंडूच्या फुलांची आकर्षक आरास व आंब्यांचा नैदेद्य देखील गाभा-यात दाखविण्यात आला होता.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात महाकालेश्वराचा मुखवटा व फुलांची आरास करण्यात आली होती. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण भारत देशातील मध्यप्रदेश या राज्यात उज्जैन या शहरात स्थित आहे. तेथील महादेवाचे दर्शन पुणेकरांना व्हावे, याउद्देशाने ही आरास साकारण्यात आली होती.

श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर गाभा-यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत विविध फुलांची सजावट व रंगावली रेखाटण्यात आली होती. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त केलेली सजावट पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

* फोटो ओळ : श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात महाकालेश्वराचा मुखवटा व फुलांची आरास करण्यात आली होती. उज्जैन येथील महाकालेश्वराची पूजा पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments