Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedबँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित "सामाजिक कृतज्ञता...

बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित “सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण” कार्यक्रम येत्या मंगळवारी दहा मार्च रोजी

 

 

पुणे

(प्रतिनिधी)

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन तर्फे यंदाचा “सामाजिक कृतज्ञता निधी” समर्पण समारंभ येत्या मंगळवारी दहा मार्च रोजी नवीपेठ येतील निवारा सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या भारती ठाकूर (मध्यप्रदेश) ह्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना,बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशन चे संस्थापक बाळासाहेब फडणवीस ह्यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.

ह्या संघटनेतर्फे दर वर्षी विविध सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक,क्रीडा,पर्यावरण,गोसेवा तसेच विविध

सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन समोर ठेवून सामाजिक कृतज्ञता निधीचे समर्पण करण्यात येत असते.आत्तापर्यंत अनेक सामाजिक संस्थांना गेल्या वीस वर्षांमध्ये दोन कोटी रुपयाच्या वर आर्थिक मदत संस्थेतर्फे करण्यात आलेली आहे.सामाजिक कृतज्ञता निधी समर्पणाचे निवृत्त बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे हे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष मोहन घोळवे,कार्यकारी अध्यक्ष भास्कर माणकेश्वर,महासचिव नारायण अचलेरकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments