Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedरंगपंचमीनिमित्त 'लक्ष्मीबाई दगडूशेठ' दत्तमंदिरात रंगांची सजावट कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर...

रंगपंचमीनिमित्त ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ’ दत्तमंदिरात रंगांची सजावट कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्यावतीने मंदिरात रंगपंचमीनिमित्त विविध रंग, पिचकारी, फुले अशी आगळीवेगळी सजावट करण्यात आली. मंदिरातील सर्व खांबांवर तसेच मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला देखील रंग आणि पिचकाऱ्या लावण्यात आल्या.

 

ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, रंगपंचमी ही आपला मराठी उत्सव. मात्र हा उत्सव आपण हळू हळू विसरत चाललो आहोत. विविध रंग, पिचकारी, फुगे अशा विविध प्रकारच्या साहित्याने ही रंगपंचमी साजरी होते. आता हे प्रमाण कमी होत असून याची आठवण पुन्हा एकदा व्हावी, याउद्देशाने मंदिरात ही सजावट करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments