Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2024 स्पर्धेत मस्कीटर्स संघाचा तिसरा विजय

पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग 2024 स्पर्धेत मस्कीटर्स संघाचा तिसरा विजय

पुणे, 9मार्च 2024- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत मस्कीटर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा, तर रॉकेट्स संघानं दुसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मस्कीटर्स संघाने तलवार्स संघाचा 546-414 असा पराभव करून विजयी मालिका कायम ठेवली.
बॅडमिंटनमध्ये अदिती रोडे, पराग चोपडा, तेजस चितळे, आदित्य गांधी, अभिजित राजवाडे, चिन्मय जोशी, अजिंक्य मुठे, अनिल देडगे, तन्मय चितळे, इरा आपटे, अनुज मेहता, शैलेश लिमये यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मस्कीटर्स संघाने तलवार्स संघाचा 189-128 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये मिहिर ठोंबरे, शिरीष कर्णिक, संतोष भिडे, नितीन पेंडसे, सार्थक प्रधान यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर मस्कीटर्स संघाने तलवार्स संघाचा 179-133 असा पराभव केला. टेनिसमध्ये मस्कीटर्स संघाने तलवार्स संघावर 178-153 असा विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात रॉकेट्स संघाने कोल्टस संघाचा 491-473 असा पराभव केला. सामन्यात बॅडमिंटन प्रकारात कोल्टस संघाने रॉकेट्सचा 173-117 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. तर, टेबल टेनिसमध्ये रॉकेट्स संघाने कोल्टसचा 185-168 असा पराभव करून बरोबरी राखली.टेनिसमध्ये रॉकेट्स संघाने कोल्टस संघाचा 189-132 असा पराभव करून विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी:
रॉकेट्स वि.वि.कोल्टस 491-473
बॅडमिंटन: रॉकेट्स वि.वि.कोल्टस 117-173
(तन्मय चोभे/राधिका इंगळहळीकरवि.वि.देवेंद्र चितळे/निलेश केळकर 30-13; केदार नाडगोंडे/कुणाल शहा पराभुत वि.आर्य देवधर/अनिकेत शिंदेकडून 12-30; अद्वैत जोशी/अमोल मेहेंदळे पराभुत वि.अमर श्रॉफ/समीर जोग 29-30; आदित्य जीतकर /सोहम कांगो पराभुत वि.अनिकेत सहस्रबुद्धे/समीर जालन 12-30, राहुल पाठक/आशुतोष सोमण पराभुत वि.गिरीश खिंवसरा/विमल हंसराज 12-30, पार्थ केळकर/तुषार मेंगळे पराभुत वि.कर्णा मेहता/इशान भाले 13-20; प्रांजली नाडगोंडे/ पराभुत वि.प्रशांत वैद्य/चंद्रशेखर आपटे 09-20);

टेबल टेनिस: रॉकेट्स वि.वि.कोल्टस 185-168
(राहुल पाठक/कौस्तुभ वाळिंबे पराभूत वि.सचिन बेलगलकर/वर्षा बदामीकर 29-30; केदार नाडगोंडे/आदित्य अभ्यंकर वि.वि.देवेंद्र चितळे/संदीप बावडेकर 30-21; तन्मय चोभे/निनाद देशमुख वि.वि.समीर जोग/रोहन जमेनीस 30-23;सारंग देवी/अद्वैत जोशी पराभुत वि.क्षितिज कोतवाल/इशान भाले 27-30; राधिका इंगळहळीकर/अभिजीत नाईकवि.वि.अभिजीत खानविलकर/आर्य देवधर 30-28; कुणाल शहा/तुषार मेंगळे पराभुत वि.प्रशांत वैद्य/कर्णा मेहता 19-20; विराज खानविलकर/आशुतोष सोमण वि.वि.विमल हंसराज/समीर जालान 20-16);

टेनिस: रॉकेट्स वि.वि.कोल्टस 189-132
(तन्मय चोभे/आदित्य अभ्यंकरवि.वि.रोहन जमेनिस/क्षितिज कोतवाल 30-15; अर्णव काळे/सारंग देवीवि.वि.अथर्व अय्यर/अभिजीत खानविलकर 30-13; राहुल मुथा/रिया वाशिमकरवि.वि.अवनी गोसावी/आर्य देवधर 20-13; निनाद देशमुख/राजेंद्र कांगोवि.वि.देवेंद्र चितळे/इशान भाले 30-19; केदार नाडगोंडे/अमित महाजनीवि.वि.कर्णा मेहता/विमल हंसराज 30-29; विराज खानविलकर/अमेय वाकणकर वि.वि.अनिकेत शिंदे/सत्यजित लिमये 20-07; राहुल पाठक/प्रांजली नाडगोंडे पराभुत वि.यश शहा/समीर जालान 19-20);

मस्कीटर्स वि.वि.तलवार्स 546-414
बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.तलवार्स 189-128
(अदिती रोडे/पराग चोपडा वि.वि.अंकित दामले/विक्रांत पाटील 30-28; तेजस चितळे/आदित्य गांधी वि.वि.रणजित पांडे/मकरंद चितळे 30-15; अभिजित राजवाडे/चिन्मय जोशी वि.वि.नितीन कोनकर/आरुषी पांडे30-23; अजिंक्य मुठे/अनिल देडगे वि.वि.अतुल ठोंबरे/संदीप साठे 30-16; तन्मय चितळे/इरा आपटे वि.वि.विश्वेश कटक्कर/मनीष शहा 30-16; देवेंद्र राठी/अविनाश दोशी पराभुत वि.सिद्धांतखिंवसरा/सचिन जोशी 19-20, अनुज मेहता/शैलेश लिमये वि.विबाळ कुलकर्णी/हरीश अय्यर 20-10);

टेबल टेनिस: मस्कीटर्स वि.वि.तलवार्स 179-133
(मिहिर ठोंबरे/पराग चोपडा वि.वि.नील केळकर/रणजीत पांडे 30-22; शिरीष कर्णिक/तन्मय चितळे वि.वि.संजय बामणे/शिल्पा पांडे 30-18; सुनील मोगरे/मकरंद फडणीस पराभुत वि.नितीन कोनकर/विक्रांत पाटील 20-30; अभिजित शहा/आदित्य गांधी पराभुत वि.कुणाल भुरट/अतुल ठोंबरे 29-30; अनुज मेहता/संतोष भिडे वि.वि.रघुनंदन बेहरे/संदीप साठे 30-13; नितीन पेंडसे/शैलेश लिमये वि.वि.गोपिका किंजवडेकर/शिवकुमार जावडेकर 20-8;सार्थक प्रधान/अजिंक्य मुठे वि.वि.मनीष शहा/प्रशांत पंत 20-12);;

टेनिस: मस्कीटर्स वि.वि.तलवार्स 178-153
(पराग चोपडा/सार्थक प्रधान वि.वि.नील केळकर/रणजित पांडे 30-25; पराग तपन/अजिंक्य मुठे पराभुत वि.शिवकुमार जावडेकर/रघुनंदन बेहरे 25-30; वैजयंती मराठे/सोहिल गाला पराभुत वि.आनंद परचुरे/अभिषेक व्यास 27-30; शैलेश लिमये/अनुज मेहता वि.वि.चारुदत्त साठे/समीहन मेहेंदळे 30-21; अभिजीत शहा/आदित्य गांधी वि.वि.विश्वेश कटक्कर/कुणाल भुरट 30-18; नितीन पेंडसे/शरयू राव पराभुत वि.विक्रांत पाटील/अंकित दामले 16-20; आदिती रोडे/तेजस चितळे वि.वि.मकरंद चितळे/आदित्य तापडिया 20-09)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments