Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedविज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड गरजेचीडॉ. बालकृृष्णन पिसुपती यांचे विचार  डॉ....

विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड गरजेचीडॉ. बालकृृष्णन पिसुपती यांचे विचार  डॉ. विश्वनाथ कराड यांचा रोटरी इंटरनॅशनल जीवन गौरव पुरस्काराने सन्मान 

 

 

पुणे, दि. १८ मार्च: ” भारतीय संस्कृतीचे दार्शनिके व तत्वज्ञाचे शिक्षण अभ्यासक्रम व शिक्षण पूरक उपक्रम (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालावी. तरच कार्यशील व उद्यमशील युवक पिढी निर्माण होईल. तसेच युवकांमधील न्यूनगंड व आत्मविश्वासाचा अभाव दूर होउन उज्ज्वल भारतीय पिढीचे संवर्धन होण्यास वेळ लागणार नाही.” असे विचार  संयुक्त राष्ट्र शैक्षणिक कार्यक्रमाचे भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालकृृष्णन पिसुपती यांनी सांगितले.

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ग्रीन हायड्रोजन रिसर्च सेंटर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शाश्वत उर्जेसाठी चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वतिने नुकतेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘सर्व्हीस अबॉऊ सेल्फ रोटरी इंटरनॅशनल जीवन गौरव पुरस्कार २०२५-२६’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे. पवार, आयसरचे गर्व्हनर डॉ. अरविंद नातू, जगदगुरू तुकोबारायांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे-देहुकर आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या जीएचआरसीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. रत्नदीप जोशी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच रोटरी ३१३१ चे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर संतोष मराठे, राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. राजेंद्रकुमार सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. बालकृृष्णन पिसुपती  म्हणाले, ” संयुक्त राष्ट्रे व भारत सरकार विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विज्ञान आणि मुल्याधिष्ठित शिक्षणाद्वाचे धडे देत आहेत. भारतामध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यक्रमच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्याचे कार्य सुरू आहे. ”

विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये उत्पती, स्थिती व लय अशा चक्रिय व्यवस्थेतून मानवी मन तसेच तंत्रज्ञान दोन्ही मार्गक्रम करीत असते. तंत्रज्ञानाचा भस्मासूर न होता ते मानव कल्याणासाठी सहाय्यक व्हावे.  विनाशकारी युद्धा एैवजी विकासात्मक गोष्टींकडे त्याचे उपयोजन होणे गरजेचे आहे. यामुळे मानवी मन नैतिकतेच्या उंचावलेल्या पातळीवर असेल. संकुचित मने आणि द्वेष भावना या द्वारे होणारी सामाजिक मुल्यांची घसरण थांबवायची असेल तर निःस्वार्थ भावना, क्षमाशिल वृत्ती आणि तात्विकतेचे तेज हे अध्यात्मा द्वारे वृद्धिंगत करावे. तसेच माऊलीचे विश्वगान असणार्‍या पसायदानाचे प्रत्येकाने जीवनात आचरण करावे. ”

डॉ. जी.डी. यादव म्हणाले, “ग्रिन हायड्रोजन व हरित उर्जेद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक स्तरावरील अग्रगण्य स्थान आहे. ज्ञानाबरोबरच उर्जा क्षेत्रात ही भारत लवकरच विश्वगुरू होईल. ”

डॉ. रत्नदीप जोशी यांनी एमआयटी द्वारे उभारलेल्या विदेशी एलपीजी ला पर्याय व अधिक किफायतशीर जैविक इंधन बायोगॅस व भविष्यकालीन ऊर्जा स्त्रोत हरित हायड्रोजनच्या कार्यरत असणार्‍या वैज्ञानिक प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंटची माहिती दिली. ”

या प्रसंगी डॉ. एन.जी.पवार यांनी सांगितले की विद्यापीठे गुरुकुल व्हावीत आणि वैश्विक ज्ञान व पुरवठा साखळी समतोल विकास साधणारी जीवन केंद्रे व्हावीत. त्यानंतर संजय खैरे, डॉ. आदित्य अभ्यंकर, यांनी वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडले.

प्रस्तावन व स्वागत संतोष मराठे यांनी केले.

सूत्रसंचालन रो. निलेश धोपडे आणि आभार रो.अरिवंद मिठसागर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments