पुणे, दि. १८: महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि ग्लोबल कॉन्फेरेशन ऑफ काऊ बेस्ड इंटस्ट्रीज (जीसीसीआय), विविध सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २३ मार्च २०२६ दरम्यान कृषी महाविद्यालय, पुणे येथे ‘गौ-टेक २६’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश गौ-आधारित शेती, अर्थव्यवस्था, ग्रामोद्योग विकास आणि बाजारपेठेला चालना देणे हा आहे. “विकसित भारत २०४७” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
गौ संवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी या प्रदर्शनातून नवे तंत्रज्ञान, उत्पादने आणि व्यवसाय संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.


