Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाला समाधी अभ्यंगस्नान व पूजेने प्रारंभ श्री...

श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाला समाधी अभ्यंगस्नान व पूजेने प्रारंभ श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम

 

 

पुणे : ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ व्या पुण्यतिथी उत्सवाला’ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला महाराजांच्या समाधीस अभ्यंगस्नान घालून पूजेने प्रारंभ झाला. समाधीस व सभामंडपासह संपूर्ण परिसरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. सनईच्या मंगल सुरावटींनी देवस्थानचा परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३६ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

 

गुरुवारी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन आणि आरती करण्यात आली. बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ पर्यंत जंगली महाराज मंदिरात उत्सव होणार आहे. उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

 

दिनांक १० मार्च ते १ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. २६ मार्च रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे.

 

बुधवार, दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सदगुरु श्री जंगली महाराजांच्या पादुकांचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि.२ एप्रिल रोजी दुपारी १ नंतर मंदिरात महाप्रसाद देण्यात येईल. उत्सवात भाविकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments