Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी अभिनेते सौरभ गोखले यांची रील रश स्पर्धेसाठी इंडसर्च इन्स्टिट्युट ऑफ...

मराठी अभिनेते सौरभ गोखले यांची रील रश स्पर्धेसाठी इंडसर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च बावधन कॅम्पसला भेट

पुणे,20 मार्च 2026 : इंडसर्च इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च तर्फे बावधन कॅम्पसमध्ये 18 मार्च 2026 रोजी रील रश – रील द रिअल कॅम्पस या रील बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.विविध लघु व्हिडिओंच्या माध्यमातून कॅम्पस जीवनाचे विविध पैलू सर्जनशील पध्दतीने सादर केले.या स्पर्धेचा उद्देश डिजिटल स्टोरीटेलिंग,सर्जनशीलता आणि विद्यार्थी सहभागाला प्रोत्साहन देणे हा होता.

 

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टी आणि वेब सीरिजमधील प्रसिद्ध कलाकार व प्रमुख पाहुणे आणि परीक्षक सौरभ गोखले यांनी कॅम्पसला भेट दिली.संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या सौरभ गोखले यांनी अभिनय क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत सत्र अधिक संवादात्मक व माहितीपूर्ण केले.

 

या कार्यक्रमाला सरसंचालक डॉ.अशोक जोशी,संचालिका डॉ.अपर्णा टेंबूलकर,सहसंचालक डॉ.विकास पेशवे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.

 

विजेत्यांची घोषणा आणि पारितोषिक वितरणासह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.सहभागी विद्यार्थ्यांसाठी हा अविस्मरणीय व समृध्द करणारा अनुभव ठरला.

 

इंडसर्च इन्स्टिट्युट विविध सर्जनशील उपक्रमांद्वारे आपल्या विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देत असून सर्वांगीण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दे

त आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments