Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सची प्रवासी वाहने महागणार

टाटा मोटर्सची प्रवासी वाहने महागणार

पुणे, २० मार्च २०२६: टाटा मोटर्सच्या नुकत्याच झालेल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमत वाढीनंतर आता प्रवासी वाहनांच्या किंमतीतही वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्रवासी वाहनांच्या किंमतीत अर्धा टक्का वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ येत्या १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.

 

ही किंमतवाढ उत्पादन खर्चामध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचा काही अंशी परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येत आहे. आयसीई पोर्टफोलिओवर सरासरी ०.५% इतकी किंमतवाढ होणार असून, ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्यांनी दिली आहे.

 

———————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments