Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedचारचाकी (खाजगी) वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया*

चारचाकी (खाजगी) वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया*

 

 

पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. नागरिकांची होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आकर्षक (पसंतीचे) नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

इच्छुकांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जासोबत डीडी (‘R.T.O., Pune’ नावाने), पत्त्याचा पुरावा व ओळखपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

 

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा अर्जदारांनी दिनांक २५ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद लिफाफ्यात वाढीव रकमेचा डीडी जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता सहकार सभागृह, आरटीओ पुणे येथे लिलाव प्रक्रिया पार पडेल.

सदर प्रक्रियेनुसार सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक देण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू शुल्क आकारण्यात येईल.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments