Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ह्युंदाई एक्‍सटरसह 'ड्राइव्‍ह टू शाइन'चा आनंद घेण्‍यास व्हा सज्‍ज

नवीन ह्युंदाई एक्‍सटरसह ‘ड्राइव्‍ह टू शाइन’चा आनंद घेण्‍यास व्हा सज्‍ज

गुरूग्राम, मार्च २०, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज ब्रँडची लोकप्रिय कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीची स्‍टायलिश व आकर्षक उत्‍क्रांती नवीन ह्युंदाई एक्‍सटरच्‍या लाँचची घोषणा केली. सुधारित कार्यक्षमता, विश्वसनीय पॉवरट्रेन आणि वैविध्‍यततेसाठी ग्राहक व समीक्षकांकडून प्रशंसा करण्‍यात आलेल्‍या ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये आकर्षक एसयूव्‍ही डिझाइनसह आधुनिक, प्रगत, सोईस्‍कर तंत्रज्ञान, विश्वसनीय कार्यक्षमता आणि शक्तिशाली सुरक्षितता आहे.

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटरच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे मॅनेजिंग डायेरक्‍टर व सीईओ श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, ”पदार्पण केल्‍यापासून ह्युंदाई एक्‍सटरला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, जेथे भारतभरातील २ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. आकर्षक डिझाइन व श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या वैशिष्‍ट्यांसह ह्युंदाई एक्‍सटरने श्रेणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या पायाला अधिक दृढ करत नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये ‘ड्राइव्‍ह टू शाइन’चा उत्‍साह समाविष्‍ट असण्‍यासह नवीन स्‍टायलिंग, अधिक प्रीमियम केबिन, स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि सुधारित सेफ्टी पॅकेज आहे. हे अपग्रेड्स कुटुंबांमध्‍ये व तरूणांमध्‍ये या एसयूव्‍हीचा अपील अधिक खास करतात, जे स्‍टाइल, व्‍यावहारिकता आणि दैनंदिन उपयुक्‍ततेचे संयोजन असलेल्‍या वैविध्‍यपूर्ण एसयूव्‍हीचा शोध घेत आहेत. नवीन ह्युंदाई एक्‍सटरने भारतातील तरूण व महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, उच्‍च दर्जाची सुरक्षितता आणि विश्वसनीय एसयूव्‍ही वितरित करण्‍याप्रती एचएमआयएलच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे.”

 

अधिक सुधारित एक्‍स्‍टीरिअर्स

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटरने आकर्षक फ्रण्‍ट व रिअर बम्‍बपर डिझाइन, रिडिझाइन करण्‍यात आलेले ब्‍लॅक रॅडियटर ग्रिल आणि आकर्षक नवीन आर१५ (व्‍यास = ३८०.२ मिमी) डायमंड-कट अलॉईजसह आपली एसयूव्‍ही उपस्थिती अधिक वाढवली आहे, ज्‍यासोबत स्‍पोर्टी विंग-टाइप स्‍पॉइलर आहे, ज्‍यामधून रस्‍त्‍यावर लक्षवेधक उपस्थितीची खात्री मिळते. एसयूव्‍ही पवित्राला अधिक शक्तिशाली करणाऱ्या प्रमाणांसह नवीन ह्युंदाई एक्‍सटर तिच्‍या श्रेणीमधील सर्वात उंची एसयूव्‍ही आहे. या एसयूव्‍हीमध्‍ये श्रेणीमधील सर्वात लांब व्‍हीलबेस आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना पायांसाठी अधिक एैसपैस जागा आणि आरामदायीपणा मिळतो.

 

प्रमुख एक्‍स्‍टीरिअर सुधारणा:

 

• विस्‍तृत व आकर्षक पुढील भागासह नवीन सेंटर गार्निश.

 

• तिच्‍या श्रेणीमधील सर्वात उंच एसयूव्‍हीसह सर्वात लांब व्‍हीलबेस.

 

• आकर्षक, अधिक स्‍पोर्टी रिअर प्रोफाइलसाठी नवीन टेलगेट व सी-पिलर गार्निश.

 

• प्रबळ, शक्तिशाली लुकसाठी अॅड-ऑन असर्टिव्‍ह व्‍हील आर्क क्‍लॅडिंग.

 

• नवीन वैशिष्‍ट्यपूर्ण विंग-टाइप स्‍पॉयलर.

 

शहरी एक्‍स्‍प्‍लोरर्ससाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये शक्तिशाली एसयूव्‍ही पवित्रासह उत्तम गतीशीलता आहे, ज्‍यामुळे ही एसयूव्‍ही शहरामध्‍ये ड्राइव्‍ह आणि वीकेण्‍डला साहसी ड्रायव्हिंगचा आनंद घेण्‍यासाठी परिपूर्ण सोबती आहे.

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटरचे आकारमान

 

लांबी (मिमी)

 

३,८३०

 

रूंदी (मिमी)

 

१,७२३

 

उंची (मिमी)

 

१,६४३^

 

व्‍हीलबेस (मिमी)

 

२,४५०

 

^रूफ रेल्‍ससह

 

 

 

विस्‍तृत इंटीरिअर्स

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटरच्‍या केबिनच्‍या आत अधिक प्रीमियम व अधिक खास अनुभव मिळतो. नवीन ड्युअल टोन नेव्‍ही व ग्रे इंटीरिअर थीम, ३डी कार्बन पॅटर्न डॅशबोर्ड फिनिश आणि स्‍पोर्टी डी-कट स्‍टीअरिंग व्‍हील आतील बाजूस उत्‍साहवर्धक अनुभव देतात.

 

स्‍पोर्टी अनुभवात अधिक भर करत नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये फर्स्‍ट-इन-सेगमेंट मेटल पेडल्‍स देखील सादर करण्‍यात आले आहेत, ज्‍यासह ड्रायव्‍हर-केंद्रित अपील अधिक आकर्षक करण्‍यात आले आहे. या एसयूव्‍हीमध्‍ये सुलभ इनग्रेस व एग्रेस, एैसपैस नी व हेडरूम, ३९१ लिटरचे[5] उच्‍च दर्जाचे बूट स्‍पेस आणि एैसपैस जागा असलेली केबिन आहे, ज्‍यामध्‍ये आता विचारशील अपग्रेड्स करण्‍यात आले आहेत, जसे सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून ड्रायव्‍हर सीट हाइट अॅडजस्‍टमेंट आणि अॅडजस्‍टेबल रिअर हेडरेस्‍ट्स, ज्‍यामधून ड्रायव्‍हर व प्रवाशांना वैयक्तिकृत आरामदायीपणा मिळतो.

 

प्रमुख इंटीरिअर सुधारणा:

 

• फर्स्‍ट-इन-सेगमेंट मेटल पेडल्‍स

 

• अधिक गतीशील, आधुनिक फीलसह नवीन स्‍पोर्टी डी-कट स्‍टीअरिंग.

 

• उत्‍साहित केबिन लुकसाठी नवीन ड्युअल टोन नेव्‍ही व ग्रे इंटीरिअर थीम.

 

• अधिक अत्‍याधुनिक फिलसाठी नवीन सुधारित ३डी कार्बन पॅटर्न डॅशबोर्ड फिनिश.

 

• लांबच्‍या प्रवासादरम्‍यान अधिक आरामदायीपणासाठी नवीन फोल्डिंग ड्रायव्‍हर आर्मरेस्‍ट.

 

• अधिक उत्‍साहवर्धक व स्‍टायलिश केबिनसाठी सेमी-फॅब्रिक सीट अपहोल्‍स्‍टरीसह एक्‍सटर ब्रँडिंगसोबत नवीन रंग व पॅटर्न.

 

• सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून ड्रायव्‍हर सीट हाइट अॅडजस्‍टमेंट आणि अॅडजस्‍टेबल रिअर हेडरेस्‍ट्स.

 

विचारशील तंत्रज्ञान

 

आपले तंत्रज्ञान तत्त्व अधिक दृढ करत नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये प्रगत सोयीसुविधा आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट डॅशकॅम आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षितता आणि दैनंदिन व्‍यावहारिकता मिळते. नवीन ह्युंदाई एक्‍सटर वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले, तसेच मागील प्रवाशांसाठी टाइप-सी यूएसबी पोर्ट आणि व्‍यापक ब्‍लूलिंक क्षमतांसह स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास अधिक कनेक्‍टेड व सोईस्‍कर होतो. नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये लोकप्रिय तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये कायम ठेवण्‍यात आली आहेत, जसे इलेक्ट्रिक सरनरूफ, डॅशकॅम, प्रगत डिजिटल क्‍लस्‍टर आणि मॅप्‍स व इन्‍फोटेन्‍मेटसाठी ओटीए अपडेट्स.

 

प्रमुख तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये:

 

• फर्स्‍ट-इन-सेगमेंट डॅशकॅम.

 

• वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले.

 

• मागील आसनावरील प्रवाशांसाठी नवीन टाइप-सी यूएसबी पोर्ट.

 

• ब्‍लूलिंकसह ६० हून अधिक कनेक्‍टेड वैशिष्‍ट्ये.

 

• ३०० हून अधिक एम्‍बेडेड वॉईस कमांड्स, जे इंटरनेटशिवाय देखील काम करतात, ज्‍यामुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळते.

 

कार्यक्षम पॉवरट्रेन पर्याय

 

ह्युंदाईचे प्रमाणित व विश्वसनीय ४-सिलिंडर १.२ लिटर केप्‍पा पेट्रोल इंजिनसह मॅन्‍युअल व एएमटी ट्रान्‍समिशनच्‍या माध्‍यमातून श्रेणीमध्‍ये मापदंड स्‍थापित करत नवीन ह्युंदाई एक्‍सटर सुधारित ४-सिलिंडर पॉवरट्रेन असलेली तिच्‍या श्रेणीमधील एकमेव मॉडेल आहे. ही प्रगत पॉवरट्रेन विविध प्रदेशांमध्‍ये व वाहतूकींमध्‍ये सुलभ, कार्यक्षम कामगिरी देते आणि आत्‍मविश्वास वाढवते.

 

एक्‍सटर हाय-सीएनजी ड्युओ

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटर हाय-सीएनजी ड्युओ लेआऊटसह १.२ लिटर बाय-फ्यूएल केप्‍पा पेट्रोल व सीएनजी पॉवरट्रेन दैनंदिन व्‍यावहारिकतेमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामध्‍ये ड्युअल सिलिंडर्स आणि प्रमाणित म्‍हणून अंडरबॉडी स्‍पेअर टायर आहे, तसेच २२५ लिटरची सामानासाठी एैसपैस जागा आहे. शहरातील प्रवासी व वीकेण्‍डला साहसी ड्रायव्हिंगचा आनंद घेणाऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली नवीन ह्युंदाई एक्‍सटर संतुलित राइड व हाताळणी कायम ठेवते.

 

पॉवरट्रेनची वैशिष्‍ट्ये:

 

• सुधारित ४-सिलिंडर १.२ लिटर केप्‍पा पेट्रोल इंजिन असलेली तिच्‍या श्रेणीमधील एकमेव एसयूव्‍ही, जे शहरामध्‍ये व महामार्गावर शांतमय, उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देते.

 

• सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित म्‍हणून स्‍पेअर टायर देण्‍यात आला आहे.

 

• १.२ लिटर बाय-फ्यूएल केप्‍पा पेट्रोलसह सीएनजी, तसेच ड्युअल सिलिंडर्स व अंडरबॉडी स्‍पेअर टायर आता प्रमाणित म्‍हणून देण्‍यात आले आहे आणि अधिक सामानाची जागा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या एसयूव्‍हीमध्‍ये दैनंदिन प्रवास व लांब अंतरापर्यंतच्‍या प्रवासासाठी २२५ लिटरची एैसपैस बूट स्‍पेस आहे

 

अधिक प्रबळ सुरक्षितता

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये सुरक्षिततेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे, जेथे ४५ हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान सर्वसमावेशक संरक्षण देतात. नवीन ह्युंदाई एक्‍सटरमध्‍ये ३० प्रमाणित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये देखील आहेत, ज्‍यासोबत इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) व हिल-स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल (एचएसी), प्रमाणित म्‍हणून ६ एअरबॅग्‍ज आहेत, ज्‍यासह सुरक्षिततेची लोकशाहीकरण करण्‍याचा वारसा कायम ठेवण्‍यात आला आहे.

 

सुरक्षितता वैशिष्‍ट्ये:

 

• अधिक खात्रीपूर्ण सुरक्षिततेसाइी ४५ हून अधिक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये.

 

• श्रेणीमध्‍ये ३० प्रमाणित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये.

 

• आता प्रमाणित म्‍हणून ईएससी आणि एचएसी.

 

• प्रमाणित ६ एअरबॅग्‍ज.

 

रंग

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटर ७ मोनोटोन व १ ड्युअल टोन रंग पर्यायांसह २ नवीन रंग पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

 

• गोल्‍डन ब्रॉंझ (नवीन)

 

• टायटॅनियम ब्‍लॅक मॅट (नवीन)

 

• टायटन ग्रे

 

• अॅटलास व्‍हाइट

 

• स्‍टारी नाइट

 

• टायटॅनियम ब्‍लॅक

 

• रेंजर खाकी

 

• रेंजर खाकीसह ब्‍लॅक रूफ (ड्युअल टोन)

 

नवीन ह्युंदाई एक्‍सटर – व्‍हेरिएण्‍ट्स आणि किंमत (एक्‍स-शोरूम, रूपये)

 

इंजिन

 

ट्रान्‍समिशन

 

व्‍हेरिएण्‍ट

 

किंमत

 

१.२ लिटर केप्‍पा पेट्रोल

 

एमटी

 

एचएक्‍स २

 

५,७९,९००

 

एचएक्‍स ३

 

६,२३,९००

 

एचएक्‍स ४

 

७,२१,९००

 

एचएक्‍स ६

 

७,९४,९००

 

एचएक्‍स ८

 

८,३५,९००

 

एएमटी

 

एचएक्‍स ३

 

६,९०,९००

 

एचएक्‍स ४+

 

८,०५,९००

 

एचएक्‍स ६

 

८,५४,९००

 

एचएक्‍स ८

 

९,०७,९००

 

एचएक्‍स १०

 

९,४१,९००

 

१.२ लिटर बाय-फ्यूएल केप्‍पा पेट्रोलसह सीएनजी

 

एमटी

 

एचएक्‍स २

 

६,९९,९००

 

एचएक्‍स ३

 

७,४३,९००

 

एचएक्‍स ४

 

८,२६,९००

 

एचएक्‍स ६

 

८,९३,९००

 

एचएक्‍स ८

 

९,४०,९००

 

 

 

ग्राहक देशभरातील कोणत्‍याही ह्युंदाई डिलरशिप्‍समध्‍ये किंवा Click to Buy प्‍लॅटफॉर्मला भेट देत नवीन ह्युंदाई एक्‍सटर ११,००० रूपयांमध्‍ये बुक करू शकतात.

 

अधिक माहितीसाठी hyundai.co.in येथे लॉग ऑन करा.

 

Brand Campaign Link

 

मीडिया संपर्क: हृयुंदाई मोटर इंडिया लिमिटेड | corporatecommunication@hmil.net

 

जारीकर्ता:

 

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड

 

सीआयएन: L२९३०९TN१९९६PLC०३५३७७

 

प्‍लॉट क्र. सी११ व सी११ए, सिटी सेंटर

 

अर्बन इस्‍टेट २, सेक्‍टर २९

 

गुरूग्राम, हरियाणा – १२२ ००१, भारत

 

अस्वीकृती: दर्शविलेली चित्रे आणि दृश्ये केवळ सादरीकरणाच्या उद्देशाने आहेत. दाखविलेली वैशिष्ट्ये आणि तपशील बदलू शकतात आणि ते स्टँडर्ड फिटमेंटचा (प्रमाणित उपकरणांचा) भाग नसतील.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments